'इंग्रजी संभाषण कौशल्ये', या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन.
सोमेश्वरनगर: बारामती तालुक्यातील मु. सा. काकडे महाविद्यालयात इंग्रजी विभागाच्या वतीने शनिवार दि. 9 एप्रिल 2022 रोजी, 'इंग्रजी संभाषण कौशल्ये' या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेचे उद्घाटन, महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. देवीदास वायदंडे यांच्या हस्ते, डॉ. जगन्नाथ साळवे, उपप्राचार्य डॉ. संजय जाधव, इंग्रजी विभाग प्रमुख, प्रा.गोरख काळे, व साधन व्यक्ती प्रा. संतोष शेळके यांचे उपस्थितीत झाले. कार्यशाळेसाठी महाविद्यालयातील विविध विद्याशाखांमधील 75 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. इंग्रजी संभाषण कौशल्य सुधारण्यासाठी विद्यार्थ्यांनी नेहमी प्रयत्नशील राहिले पाहिजे असे मत महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. देवीदास वायदंडे यांनी त्यांच्या उद्घाटनपर भाषणात व्यक्त केले. याप्रसंगी डॉ. साळवे सर यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. साधन व्यक्ती, प्राध्यापक संतोष शेळके यांनी विद्यार्थ्यांना विविध संभाषण कौशल्ये विकसित करण्याची तंत्रे व उपायोजना यांची माहिती त्यांच्या व्याख्यानातून विद्यार्थ्यांना दिली. कार्यशाळेची प्रस्तावना आणि आभार कार्यशाळेचे समन्वयक, प्रा. गोरख काळे यांनी केले.