Type Here to Get Search Results !

पुणे जिल्ह्यातील पी.एम.पी पासेस बंद ,प्रवाशांमधुन तीव्र संताप पी.एम.पीच्या निर्णयावर दत्ताञय फडतरे यांची टिका

पुणे जिल्ह्यातील पी.एम.पी पासेस बंद ,प्रवाशांमधुन तीव्र संताप
     
पी.एम.पीच्या  निर्णयावर दत्ताञय  फडतरे यांची टिका 
पुणे - पुणे परिवहन महामंडळाने जिल्ह्याच्या ग्रामीण  भागातील बसेस सुरु केल्या आहेत.पुणे महानगरपालिका ,पिंपरी -चिंचवड  महापालिका हदद वगळुन सवलतीच्या दरात असणारे  पास  एक एप्रिलपासुन रदद करण्याचा निर्णय पी.एम.पीने  घेतला आहे.या निर्णयास पी.एम.आर.डी.ए भागातील प्रवाशांचा मोठा विरोध केला आहे .पी.एम.पी ने पासेस बंद करण्याचा निर्णय तातडीने  मागे घेण्याची  मागणी पुणे -सासवड मार्गावरिल  दत्ताञय फडतरे यांनी पुणे महानगर परिवहन महामंडळाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा यांकडे केली आहे.


जिल्ह्यातील मोरगाव ,जेजुरी, सासवड ,भुलेश्वर ,वीर ,निरा, यवत, उरुळीकांचन ,दौंड, मंचर, वेल्हा ,राजगुरुनगर ,कापुरव्होळ ,जुन्नर ,मुळशी ,शिरुर लोणावळा ,शिक्रापुर ,पाबळ याभागात बसेस सुरु आहेत.या भागातील प्रवाशांचे  सवलतीतील पासेस  बंद केले आहेत ,पासेसमुळे महामंडळास तुट सहन करावी लागत  असल्याचे सांगितले जात आहे .पी.एम.पीचे शहरात १४ डेपो आहेत,या डेपोसह ९ व्यावसायिक इमारती आहेत.त्यादवारे पी.एम.पी ला १० ते १२ कोटीपर्यंत जाणारे उत्पन्न अपेक्षित असत ,माञ मोठ्या प्रमाणात थकबाकीमुळे  केवळ ६ कोटीचे उत्पन्न मिळाले आहे हे वसुल करण्याकडे लक्ष देणं अपेक्षित असताना सर्वसामान्य प्रवाशांचे सवलतीतील सेवा बंद करण म्हणजे वड्याच तेल वाग्यांवर काढणं आहे का ? 

एकीकडे प्रदुषण कमी करण्यासाठी इ- बस वापरला प्रोत्साहन देण्याच्या गोष्टी केल्या जातात .तर दूसरी कडे सवलतीतील पास बंद करुन नागरिकांना खासगी वाहनांनी प्रवास करण्यासाठी प्रवृत्त केले जात आहे सवलत बंद केल्याने खासगी वाहनाने केलेला प्रवास आणि पी.एम.पी ने केलेला प्रवास यात  प्रशासनाने काय फरक ठेवला आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे.

केंद्रशासनाच्या रेल्वेमध्ये सवलतीचे पास असतात . महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडे एस.टी प्रवाशांसाठी सवलतीचे पास असतात तर पी.एम.पी ला सवलतीचे पास का नकोत ? प्रवाशांना पासेस वापरुन सवलतीच्या दरात प्रवास मिळणे हा प्रत्येक नागरिकांचा  हक्क आहे तो प्रवाशांना मिळायला हवा . पी.एम.पी ने तिकीट दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे  तर यापुर्वी असणारा  पी.एम.पी चा दैनिक ७० रुपयांचा पास आहे तो १००  रुपयांना ,तर मासिक १४०० रुपयांचा मासिक पास १६०० रुपयांना करण्यास हरकत नाही .पण सवलतीतील पासेस पुर्णपणे बंद करणे हा कोणता पर्याय आहे असा सवाल फडतरे यांनी केला आहे.

दैनिक आणि मासिक हे सवलतीतील पासेस बंद केल्यामुळे हातावर पोट असणारे कष्टकरी  ,कामगार. महिलावर्ग ,शेतमजुर , व्यवसाय -धंद्यासाठी ये -जा करणारा तरुण वर्ग ,जेष्ठ नागरिक ,सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील शाळा- महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मोठा आर्थिक   फटका बसत आहे. महामंडळाने सवलतीचे पासेस बंद करुन  ग्रामीण पी.एम.पी  प्रवाशांची लुटमार सुरु केली असल्याचा आरोप फडतरे यांनी केला आहे.

पुणे परिवहन महामंडळाने सवलतीतील पासेसच्या दरात काहीशा प्रमाणात वाढ करावी पण पास पुर्णपणे बंद करण्याचा निर्णय मागे घेण्याची मागणी फडतरे यांनी पी.एम.पी महामंडळाकडे निवेदनादवारे केली आहे.


एस.टी सेवेवर सात -आठ महिन्यानंतरही पुर्णपणे तोडगा निघाल्याचे दिसत नाही .दूसरीकडे पी.एम.आर.डी.ए मधील  पी.एम.पी प्रवाशांचे सवलतीतील पासही बंद  केले आहेत. प्रशासनाने  तोंड दाबुन बुक्य्यांचा मारा अशी व्यवस्था प्रवाशांची केली आहे.ग्रामीण भागातील लोकप्रतिनिधी,जिह्याचे पालकमंञी यांनी पी.एम.आर.डी.ए मधील सर्वसामान्य पी.एम.पी  प्रवाशांना सवलतीतील पास  सुरु करुन दिलासा देण्यासाठी  पुढाकार घेण्याची गरज फडतरे यांनी व्यक्त केली आहे



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test