बारामती ! राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते शेटफळगढे परिसरात विविध विकासकामांचे भूमिपूजन
बारामती, दि.१६: राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते इंदापूर तालुक्यात शेटफळगढे परिसरातील विविध विकासकामांचे
भूमिपूजन आणि उद्घाटन शुक्रवारी सायंकाळी करण्यात आले.
शेटफळगढे ते म्हसोबाची वाडी रस्ता (१३ कोटी ४४ लाख), म्हसोबाची वाडी ते लाकडी काझड रस्ता (१७ कोटी), शेटफळगढे कोठारी फार्म ते पोंदवडी रस्ता (९ कोटी), मदनवाडी-पिंपळे ते निरगुडे रस्ता (१० कोटी ६२ लाख), मदनवाडी ते बारामती रस्ता (१ कोटी), निरगुडे येथील पूल बांधणे (२ कोटी ११ लाख) व इतर ६३ कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन व उदघाटन करण्यात आले.
कार्यक्रमाला जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिन सपकळ, कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक आबा देवकाते, छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक निवृत्ती सोनवणे, अनिल बागल, संचालिका नंदा वाबळे, सुमन दराडे, शेटफळगडेच्या सरपंच रुपाली वाबळे, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.
राज्यमंत्री भरणे यावेळी म्हणाले, इंदापूर तालुक्यात विविध ठिकाणी विकास कामे होत असून विकासकामांसाठी लागणारा निधी कमी पडू दिला जाणार नाही. शेटफळगढे गावातील विकासासाठी आवश्यक असल्यास आमदार निधीतूनही सहकार्य करण्यात येईल.
जल जीवन मिशन अंतर्गत प्रत्येक घरात नळाद्वारे पाणी कसे मिळेल यासाठी व शेतीसाठी पाणी पुरवठा सुरळीत राहण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. जलसंधारणाची काही कामे असल्यास ग्रामपंचायतीने तसे प्रस्ताव सादर करावेत. गोरगरीब, अल्पसंख्याक, मागासवर्गीय नागरिकांच्या विकासासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. इंदापूर शहरामध्ये सुशोभीकरण करण्यात येत असून त्यामुळे शहराचा कायापालट होण्यास मदत होईल. परिसरातील २२ गावांमधील पिण्याच्या पाण्याची समस्या कायमची दूर करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. तालुक्यातील विकासाचा लाभ प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.