प्रा.जवाहर चौधरी यांना पी एच डी. पदवी प्राप्त..!
सोमेश्वरनगर - मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यलय, सोमेश्वरनगर - वाघळवाडी ( ता बारामती) येथील भूगोल विभागाचे प्रमुख प्रा.जवाहर लक्षमणराव चौधरी यांना सावित्रबार्इ फुले पुणे विद्यपीठाकडून पी एच डी. पदवी प्रदान करण्यात आली.
प्रा. चौधरी हे मु. सा. काकडे महाविद्यालय सोमेश्वरनगर येथे गेली ३४ वर्ष भूगोल अध्यापनाचे काम करीत आहेत.
त्यांचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक शोध निबंध प्रकाशित झाले आहेत. भूगोल विषयाच्या अभ्यासक्रमावर आधरित १७ पुस्तकांचे लेखन त्यांनी केले आहे.
विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्ली यांचा एक लघु संशोधन प्रकल्प पूर्ण केला आहे.
प्रा. जवाहर चौधरी यांनी ' बारामती तालुक्यातील कृषीपूरक उद्योग धंद्यांचा सामाजिक आर्थिक विकासामध्ये योगदान - एक भौगोलिक दृषटिकोनातून केलेला अभ्यास ' या विषयांवर पी एच डी. संशोधन कार्य पूर्ण केले. संशोधनासाठी प्रा.डॉ. पी. एच. म्हस्के (नेवासा) व प्रा.डॉ. एस. बी. ओगले (विद्या प्रतिष्ठान बारामती ) यांचे मार्गर्शन लाभले.
प्रा. चौधरी यांनी पी. एच डी. पदवी प्राप्त केल्याबद्दल महाविदयालयाचे अध्यक्ष श्री. सतिशराव काकडे देशमुख , सचिव प्रा. जयवंतराव घोरपडे, सहसचिव श्री. सतिश लकडे, प्राचार्य. डॉ देविदास वायदंडे, सर्व महाविद्यालयीन व्यवस्थापन परिषदेचे सर्व सन्मानिय सदस्य, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.