Type Here to Get Search Results !

नव निर्वाचित आमदारांसाठी संसदीय कामकाज प्रशिक्षण कृती कार्यक्रम : उपसभापती डॉ नीलम गोऱ्हेडॉ. गोऱ्हे देणार पानिपत स्मारकाला भेट

नव निर्वाचित आमदारांसाठी संसदीय कामकाज प्रशिक्षण कृती कार्यक्रम : उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे
डॉ. गोऱ्हे देणार पानिपत स्मारकाला भेट

नवी दिल्ली : महाराष्ट्र विधीमंडळा च्या आमदारांसाठी ५ आणि ६ एप्रिल २०२२ रोजी संसदीय प्रशिक्षण कृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज येथे सांगितले. तसेच, छत्रपती शिवाजी महाराजांच्या शूर मावळ्यांना अमरत्व आलेल्या पानिपत येथील स्मारकाची व्यवस्था अधिक चांगली होण्या च्यादृष्टीने स्मारकाला भेट देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

       महाराष्ट्र सदनात डॉ. गोऱ्हे यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसोबत संवाद साधला त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.

   महाराष्ट्र विधीमंडळाच्यावतीने विधानसभा व विधानपरिषदेच्या नवनिर्वाचित आमदारांसाठी लोकसभा सचिवालय आणि प्राईड संस्थेच्या संयुक्त विद्यमाने ५ आणि ६ एप्रिल २०२२ रोजी संसदीय प्रशिक्षण कृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .या कार्यक्रमांतर्गत राज्यातील नवनिर्वाचित आमदारांसह एकूण ११० आमदारांनी नोंदणी केली असून आमदारां ची चांगली उपस्थिती राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. उपराष्ट्रपती तथा राज्यसभेचे सभापती एम. व्यंकैय्या नायडू लोकसभा अध्यक्ष ओम बिरला तसेच महाराष्ट्र विधीमंडळाचे पिठासीन अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

मान्यवरांच्या उपस्थितीत होणाऱ्या या प्रशिक्षण शिबिराबद्दल राज्यातील आमदारांना उत्सुकता आहे. कार्यक्रमाच्या उद्घाटनात प्रमुख अतिथी म्हणून तसेच त्या या प्रशिक्षणाला दोन्ही दिवस उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. विधीमंडळ कामकाजाबाबत लोकसभा अध्यक्षांना निवेदन देण्याच्या सूचना विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी केल्या आहेत. त्यानुसार लोकसभा अध्यक्षांना निवेदन देणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

*पानिपत स्मारकाच्या व्यवस्थेबाबत स्थानिक व अधिकाऱ्यांसोबत चर्चा*

छत्रपती शिवाजी महाराजांच्या शूर अनुयायांनी महाराष्ट्राबाहेर उत्तरेतही समर्थपणे परकीय सत्तांचा सामना करत देश रक्षणाचे कार्य केले. देश रक्षणासाठी पानिपत येथे धारातिर्थी पडलेल्या या शुरांच्या स्मरणार्थ बांधण्यात आलेल्या पानिपत स्मारकाला भेट देवून या स्मारकाची व्यवस्था अधिक चांगली होण्यासाठी स्थानिक मराठी संघटना, जिल्हाधिकारी व महानगर पालिकेच्या आयुक्तांशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. हरियाणा राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्याबाबत स्थानिक शिवप्रेमींची मागणी आहे. यासंदर्भात रोड मराठा समाजाच्या प्रतिनिधीसोबतही चर्चा करणार असल्याचे डॉ. गोऱ्हे म्हणाल्या कर्नाल आणि कुरुक्षेत्र येथेही भेटीचा कार्यक्रम असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test