मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून महावीर जयंतीच्या शुभेच्छा
मुंबई, दि. १४:- जैन धर्मांचे २४वे तीर्थंकर भगवान महावीर यांच्या जयंती निमित्त त्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विनम्र अभिवादन केले आहे. तसेच महावीर जयंतीच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.
शुभेच्छा संदेशात मुख्यमंत्री म्हणतात, भगवान महावीर यांनी सर्व प्राणिमात्रांच्या अस्तित्वाबाबत 'जगा आणि जगू द्या " असा संदेश दिला. सत्य, अहिंसा आणि सत्प्रवृत्ती याबाबत पंचशील तत्वांची शिकवण दिली. त्यांचा मानवकल्याणाचा विचार आजही जगासाठी प्रेरणादायी आहे. भगवान महावीर यांच्या जयंती निमित्त त्यांना कोटी कोटी प्रणाम. जयंतीनिमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा.