Type Here to Get Search Results !

शेतकऱ्यांनो गट शेतीच्या माध्यमातून समृद्ध व्हा... डॉ. अविनाश पोळ

शेतकऱ्यांनो गट शेतीच्या माध्यमातून समृद्ध व्हा... डॉ. अविनाश पोळ
बारामती - पाणी फाऊंडेशन आयोजित समृद्ध गाव स्पर्धा अंतर्गत सत्यमेव जयते फार्मर कप २०२२ गटशेती स्पर्धा संदर्भात शेतकऱ्यांना  मार्गदर्शन करण्यासाठी पाणि फाऊंडेशन चे प्रमुख मार्गदर्शक डॉ.अविनाश पोळ  २८/०४/२०२२ रोजी बारामती तालुका दौऱ्यावर असताना जळगाव सुपे या ठिकाणी आले होते, यावेळी त्यांनी पानी फाउंडेशन च्या सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धा संदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांनी एकत्र येऊन गट तयार करुन शेती करावी शेतकऱ्यांची एकी असेल तरच शेतकरी समृद्ध होईल असे त्यांनी प्रतिपादन केले. पानी फाउंडेशन 2016 पासुन 2019 पर्यत दुष्काळ मुक्तीसाठी  सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून काम करत होते, परंतु 2020 पासुन समृद्ध गाव स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे त्या माध्यमातून गट शेतीला प्राधान्य देण्यात येत आहे त्या संदर्भात डॉक्टर पोळ यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले, तसेच या वेळी त्यांनी बारामती फार्मर प्रोडुक्सर कंपनीच्या कार्यालयास भेट दिली व संचालक मंडळास मार्गदर्शन केले. या कार्यक्रम प्रसंगी बारामती पंचायत समिती चे मा.सभापती पोपटकाका पानसरे, पानी फाउंडेशन तालुका समन्वयक पृथ्वीराज लाड,जळगाव सुपे च्या सरपंच कौशल्या खोमणे उपसरपंच दिपक येडे  बारामती फार्मर  प्रोडुसर कंपनी चे चेअरमण सुनिल जगताप, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्त उपस्थित होते. कार्यक्रमासाठी स्पर्धेमध्ये सहभागी असलेल्या बारामती तालुक्यातील कार्हाटी नारोळी पानसरेवाडी देऊळगाव रसाळ येथील प्रतिनिधी जलमित्र शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test