जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोसले वस्ती निमगाव केतकी या ठिकाणी इयत्ता पहिली च्या विद्यार्थ्यांचे प्रवेश व स्वागत
पालक मिटिंग संपन्न...!
इंदापूर प्रतिनिधी दत्तात्रय मिसाळ-दिनांक 4 एप्रिल रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोसले वस्ती इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा प्रवेश सोहळा तसेच पालकांचे व विद्यार्थ्यांचे स्वागत लेझीम ढोल पथक वाजवून करण्यात आले तसे शाळेसमोर रांगोळी नवीन विद्यार्थ्यांच्या वरती पुष्पवृष्टी यावेळी करण्यात आले तसेच याच ठिकाणी पालक मीटिंग संपन्न झाली या मीटिंगसाठी शाळेचे केंद्रप्रमुख अध्यक्ष म्हणून श्री तावरे साहेब हे उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामपंचायत सदश्या अलका माणिक भोंग उपस्थित होत्या. पालक मिटिंग मध्ये एडवोकेट सचिन राऊत सर्जेराव जाधव गुरुजी माझी स्वातंत्र्यसैनिक अडसूळ यांनी विद्यार्थ्यांना व पालकांना मार्गदर्शन केले शाळेसाठी जास्तीत जास्त वेळ देऊन विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी सतत प्रयत्नशील असणारे समाधान भोंग सर शेंडे व कुदळे मॅडम यांचा मान सन्मान करण्यात आला यावेळी कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेंडे मॅडम यांनी केले तर आभार कुदळे मॅडम यांनी मानले