गोतंडी गावातील राष्ट्रवादी कार्यकर्ता फुटल्यामुळे भाजपची एखादी सत्ता- सुनील कांबळे
इंदापूर प्रतिनिधी दत्तात्रय मिसाळ - मौजे गोतंडी तालुका इंदापूर या ठिकाणी गोतंडी विविध कार्यकारी विकास सहकारी सोसायटीचे निवडणूक आत्ताच पार पडली. यामध्ये भारतीय जनता पार्टी पुरस्कृत गौतमेश्वर विकास पॅनल यांनी तेरा ची तेरा जागेवर विजय प्राप्त केला. तर राष्ट्रवादी चा असलेल्या पॅनेल यांना एकही जागा मिळाली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पॅनलचे असलेले उमेदवार सुनील कांबळे यांनी आमचेच काही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रातोरात फुटले असल्यामुळे आमचा पराभव झाला. असल्याची कबुली दिली यामध्ये त्यांनी मतदानाच्या आदल्या दिवशी रात्री राष्ट्रवादीचे कार्यकर्ते 50 50 हजार रुपये घेऊन फुटले व त्यांनी भाजपचे काम केले. त्यामुळे आमचा पराभव झाला आहे. राष्ट्रवादीच्याच अंतर्गत वादामुळे व गटबाजी मुळे आमच्या ताब्यात असलेली दहा वर्षाची सत्ता ही भाजपच्या ताब्यात गेलेले आहे. कोण कोण कार्यकर्ते फुटले यांची नावे सुनील कांबळे यांना आमच्या प्रतिनिधी विचारल असता. त्यांनी त्यांची नावे नंतर जाहीर करू असे सांगितले. झालेला सर्व प्रकार राज्यमंत्री दत्तामामा भरणे यांच्या कानावरती घालनार असल्याचे ही त्यांनी सांगितले. त्यावरती दत्तामामा भरणे काय निर्णय घेतील याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.