निरा नागरी पतसंस्थेच्या चेअरमनपदी राहुल काकडे.
नीरा - निरा ( ता.पुरंदर) येथील निरा नागरी सह. पतसंस्थेच्या नवनिर्वाचित चेअरमनपदी राहुल शामराव काकडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मंगळवारी (दि.१२) रोजी पुरंदरचे सहाय्यक निबंधक श्रीकांत श्रीखंडे यांच्या उपस्थितीत ही निवड करण्यात आली.
निरा नागरी सह. पतसंस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक मागील आठवड्यात झाली .यावेळी या निवडणूकीत राहुल काकडे, किरण निगडे, पंकज काकडे, नागेश काकडे, संतोष कोंडे, अरूण फरांदे, प्रविण राजे, राजकुमार बनसोडे, फुमराज काळे, रेणुका कोठडिया, मनिषा काकडे आदींची संचालकपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी संस्थेचे संस्थापक शामकाका काकडे, सचिव सरिता देव, कर्मचारी प्रकाश काकडे, सोमनाथ देवकर,
मन्सुर सय्यद, विठ्ठल कर्नवर , विजय लकडे, गणपत पिंगळे, बाळासाो निंबाळकर, शिवाजी पिंगळे यांच्यासह सभासदांनी नवनिर्वाचित संचालक मंडळाचे अभिनंदन केले.