शिवनगर येथील शारदाबाई पवार विद्यालयातील माजी विद्यार्थीनी वैष्णवी अनपट आणि श्रेया लोखंडे यांची गोदरेज ऍग्रोव्हेट कंपनी अंतर्गत एक महिन्याच्या इंटरशिप साठी निवड
सोमेश्वरनगर - शिवनगर येथील शारदाबाई पवार विद्यालयातील माजी विद्यार्थीनी वैष्णवी अनपट आणि श्रेया लोखंडे यांची गोदरेज ऍग्रोव्हेट कंपनी अंतर्गत एक महिन्याच्या इंटरशिप साठी निवड झाली असून, त्यानां 15 एप्रिल ते 15 मे दरम्यान गोदरेज कंपनीच्या मिरज, सांगली युनिटला प्रशिक्षण मिळेल.
वैष्णवी आणि श्रेया या विद्यालयातील फाली या शेती विषयक उपक्रमा चा माजी विद्यार्थीनी असून फाली ने त्याना ही संधी उपलब्ध करून दिली आहे. कोरोना च्या सावटा नंतर प्रथमच यावर्षी फाली च्या माजी विद्यार्थ्यांना अनुभवा साठी बारावी नंतर एक इंटरशिप कार्यक्रम तयार केला आहे. त्यासाठी फाली च्या महाराष्ट्रातील जवळ जवळ 40 शाळामधून फक्त 10 विद्यार्थ्यांची अनेक दिवस पडताळणी करून व गुणवत्तेच्या आधारावर मुलाखत घेऊन निवड झाली आहे. या इंटरशिप कार्यक्रमासाठी पश्चिम महाराष्ट्रातून 160 विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता. त्यामध्ये शारदाबाई पवार विद्यालयातील वैष्णवी आणि श्रेया यांची निवड झाली असून एक महिना त्यांना मोफत प्रशिक्षण, मानधन तसेच प्रशस्तीपत्रक व आकर्षक विद्यालयीन उपयोगी वस्तू मिळणार आहेत.
यासाठी विद्यालयातील प्राचार्य खोमणे सर तसेच इतर शिक्षक कर्मचारी व फालीच्या शिक्षिका स्नेहा रासकर- बनकर यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. या निवडीसाठी गावातील सर्व स्तरातून व शिक्षकांकडून कौतुक होत आहे.