पुरंदर ! वागदरवाडी काँग्रेस कमिटीच्या
अध्यक्षपदी शरद कदम
पुरंदर प्रतिनिधी - वागदरवाडी (ता. पुरंदर) येथील काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी शरद बापुराव कदम यांची निवड करण्यात आली आहे .
सासवड येथील कार्यक्रमात पुरंदर हवेलीचे लोकप्रिय आमदार व काॅग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजयजी जगताप यांच्या हस्ते शरद कदम यांना निवडीचे पत्र देण्यात आले आहे.
याप्रसंगी काँग्रेसचे महासचिव गणेश जगताप सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक महेश राणे, पुरंदर पर्यावरण विभागाचे अध्यक्ष संदीप दाते आडाचीवाडी काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बजरंगनाना पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
या दरम्यान आमदार संजयजी जगताप यांसह काॅग्रेसचे प्रवक्ते अॅड विजयजी भालेराव पुरंदर पंचायत समितीच्या सदस्या सुनिताकाकी कोलते व विविध मान्यवरांच्या हस्ते शरद कदम यांचा निवडीबद्दल विशेष सन्मान करण्यात आला असून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देखील देण्यात आल्या आहेत.
यावेळी शरद कदम म्हणाले आमदार संजयजी जगताप यांच्या माध्यमातून वागदरवाडी येथील विविध विकास कामे मार्गी लावणार आहे.