जिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख यांच्या हस्ते राष्ट्रीय कुटुंब योजनेच्या धनादेशाचे वाटप
इंदापूर प्रतिनिधी दत्तात्रय मिसाळ - दि.२० एप्रिल रोजी इंदापूर तहसिल कार्यालयात पुणेचे जिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख यांच्या हस्ते राष्ट्रीय कुटूंब लाभ योजनेतून ९ लाभार्थीना प्रत्येकी २० हजार रु प्रमाणे १लाख ८० हजार रुपयेचा धनादेशांचे वाटप संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष सागरबाबा मिसाळ अध्यक्षते खाली करण्यात आले. यावेळी बारामतीचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, इंदापूरचे तहसिलदार श्रीकांत पाटील नायब तहसिलदार अनिल ठोंबरे संगोया तहसिलदार प्रियंका वैयंकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते .
यावेळी जिल्हाधिकारी देशमुख यांनी संजय गांधी निराधार योजनेच्या कामाचे कौतुक करून शाबासकीची थाप दिली . जास्तीत जास्त लोकांपर्यंतही योजना कशी पोहोचेल व याचा फायदा गोरगरीबांना कसा होईल यासाठी सर्व कर्मचारी अधिकारी यांना सूचना दिल्या.