सायंबाचीवाडी सोसायटी अध्यक्षपदी विजय गोलांडे यांची निवड.
सोमेश्वरनगर : सायंबाची वाडी ( ता बारामती) येथील श्री. स्वयंभूनगर विविध कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्ष पदी विजय गुलाबराव गोलांडे तर उपाध्यक्ष पदी अमोल आनंदा कांबळे यांची बिनविरोध निवड झाली.
बारामती तालुक्यात गाजलेले व चर्चेत राहीलेल्या सोसायटी निवडनुकीत खडकी कॉन्टेमेट बोर्डाचे उपाध्यक्ष दुर्योधन भापकर व पंचायत समिती सदस्य राहुल भापकर यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने १३ पैकी १३ जागेवर दणदणीत विजय मिळवत विरोधी सोमेश्र्वर कारखान्याचे माजी संचालक डी. पी. जगताप यांच्या पॅनेलचा १३/०० ने पराभव करत तीस वर्षाची सत्ता उलधवून टाकली आहे.
साहाय्यक निबंधक कार्यालयात नवनिर्वाचित सदस्यांची बैठक पार पडली. यामध्ये अध्यक्षपदासाठी विजय गोलांडे यांचा तर उपाध्यक्ष पदासाठी अमोल कांबळे यांचा प्रत्येकी एक अर्ज आल्याने अध्यक्षपदी विजय गोलांडे यांची तर उपाध्यक्षपदी अमोल कांबळे यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी संजय बोबडे यांनी जाहीर केले. यावेळी पॅ नेल प्रमुख दुर्योधन भापकर, राहुल भापकर, मुनीर तांबोळी,विजय बारवकर, नामदेव ठोंबरे, नारायण भापकर, मनोहर भापकर,अंकुश जगताप यांच्यासह सभासद व ग्रामस्थ उपस्थित होते..