राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांना भारतरत्न देण्यात यावा - डॉ. स्वप्नील देवकाते
इंदापूर प्रतिनिधी-दत्तात्रय मिसाळ - निमगाव केतकी या ठिकाणी सत्यशोधक प्रतिष्ठान यांच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी महात्मा फुले हे खरे राष्ट्रपिता आहेत. त्यांनी स्त्रियांच्या शिक्षणासाठी फार मोठे कार्य केले आहे. फुले यांनी भारत देशातील सामान्यातील सामान्य लोकांना न्याय देण्याचे काम केले आहे. राष्ट्रपिता फुले यांना भारतरत्न देण्यात यावा अशी मागणी डॉक्टर स्वप्नील देवकाते यांनी यावेळी केली. डॉक्टर देवकाते यांच्या शुभ हस्ते राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून जयंतीनिमित्त पेढे वाटण्याचा कार्यक्रम करण्यात आला. यावेळी बहुजन समाज पार्टीचे प्रदेश सचिव अजित ठोकळे यांनी मनोगत व्यक्त केले या ठिकाणी बबन खराडे यांचा वाढदिवस असल्यामुळे त्यांचा मान सन्मान करण्यात आला.तसेच इंदापूर अर्बन बँकेचे चेअरमन देवराज (भाऊ) जाधव यांना राज्यकर्ता पुरस्कार प्रदान झाल्यामुळे त्यांचा देखील मान सन्मान करण्यात आला. यावेळी उपस्थित म्हणून बहुजन मुक्ती पार्टी चे बाबासाहेब भोंग, सामाजिक कार्यकर्ते अमोल राऊत, ग्रामपंचायत सदस्य मधुकर भोसले, अजित मिसाळ, अनिल भोंग, प्रहारचे संजय राऊत, सचिन देशमाने, सचिन शिंदे, एडवोकेट सुभाष भोंग माजी ग्रामपंचायत सदस्य गोपाल भोंग, माणिक भोंग, नितीन राऊत, इमाम मुलानी, अमोल जाधव, सुहास जाधव, नितीन राऊत, नाना बारवकर, कचरवाडी चे परशुराम बरळ पक्ष मित्र धनंजय राऊत, दादासाहेब आदलिंग, राजू जठार, भारत मिसाळ, अमोल बनसोडे, पोपट भोंग, सतिश पिसे, महादेव भोंग हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन सत्यशोधक प्रतिष्ठानचे अध्यक्ष दत्तात्रय मिसाळ उपाध्यक्ष नीलकंठ भोंग सचिव प्रवीण डोंगरे कार्याध्यक्ष हनुमंत मिसाळ सदस्य सुमित मिसाळ यांनी केले होते.