बुधवारपासून करंजे गावच्या यात्रेला सुरुवात: विविध कार्यक्रमाचे आयोजन.
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील करंजे गावच्या काळभैरवनाथ देवाची यात्रा बुधवार दिनांक 27 एप्रिल पासून सुरु होत आहे. यात्रेदरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याची माहिती गावच्या भैरवनाथ यात्रा उत्सव कमिटीने दिली आहे.
आजच्या दिवशी संध्याकाळी 6 वाजून 58 मिनिटांनी देवाचीकाठी (छबिना) मिरवणूकीचा निघणार आहे. गुरुवार दिनांक 28 रोजी सकाळी 10 वाजता व संध्याकळी 9:30 या वेळेत चंद्रकांत विरळीकर यांचा लोकनाट्य तमाशा होणार आहे.
दिनांक 29 रोजी संध्याकाळी ९ वाजता खास महिलांसाठी मराठी व हिंदी लोकगीतांचा ऑर्केस्ट्रा पुनम शिंदे म्युझिकल नाईट हा ठेवण्यात आला आहे. या सर्व कार्यक्रमांचा गावातील नागरिकांनी आस्वाद घेऊन यात्रा कमिटीस सहकार्य करावे वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक सोमनाथ लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली करंजेपुल दूर क्षेत्राचे पोलीस निरीक्षक योगेश शेलार यांनी अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस यांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असल्याची माहिती करंजगाव यात्रा कमिटी ने दिली.