जेष्ठ पत्रकार यांच्या शुभहस्ते श्री सोमेश्वर मंदिर,बागलवस्ती - केसकरवाडी येथे अग्निहोम सोहळा संपन्न.
अकलूज (दिनांक 3/4/2022) : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर श्री सोमेश्वर मंदिर बागलवस्ती - केसकरवाडी (तालुका पंढरपूर)येथे अग्निहोम सोहळा धार्मिक वातावरणात संपन्न झाला. अग्निहोम सोहळ्यानिमित्त श्री शिवलिंगास अभिषेक पूजा आणि श्री शांतवन मानाचे एक नंबर प्रचारक, शिवशक्तीभक्त भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे (सर्व जेष्ठ पत्रकार) यांच्या शुभहस्ते श्री सोमनाथ महात्म्य ग्रंथ पारायण ओल्या पडदेने झाले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून बावडा (तालुका इंदापूर) येथील शिवशक्तीभक्त संचारधारक अशोक सिताराम सरवदे महाराज आणि अकलूज येथील शिवशक्ती भक्त सुनील ज्ञानेश्वर कांबळे महाराज (कार्यकारी संपादक पाक्षिक वृत्त एकसत्ता) उपस्थित होते.
श्री सोमनाथ महात्म्य पारायण भाग्यवंत ल. नायकुडे,सौ. सविता वसंत बागल आणि रेखा भोसले यांनी केले. यावेळी श्री शिवलीलामृत ग्रंथाच्या अध्यायाचे पारायण घेण्यात आले.अग्नि होमाचे निमित्ताने श्री सोमनाथ विनवण्यांच्या कार्यक्रमाबरोबरच परिसरातील भजनी मंडळांचा भजनाचा कार्यक्रम घेण्यात आला. अग्नी होमा निमित्त सायंकाळी ठीक सात वाजता श्री सोमनाथ महात्म्य ग्रंथ पारायणा सह श्री शिवलिंगास अभिषेक करून शांतवन घालण्यात आले रात्री सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास अग्नि होम प्रज्वलित करण्याच्या ठिकाणचे विधीवत पूजन करून अग्नि होमाची तयारी पूर्ण केली. परंपरेनुसार रात्री सव्वा अकराच्या सुमारास शिवशक्तीभक्त मानाचे प्रचारक नायकुडे यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अग्नि होमाचे पूजन करून अग्नि होम प्रज्वलित करण्यात आला. मध्यरात्री सव्वा बाराचे दरम्यान अग्नी होम फोडून सर्वप्रथम ओल्या पडदेने असणारे मानकरी आणि भाविक भक्त अग्निहोमातून चालत गेले.
श्री सोमेश्वर मंदिराचे व्यवस्थापक वसंत गणपत बागल, संचारधारिका सौ. सविता वसंत बागल, अरविंद गणपत बागल, हनुमंत गणपत बागल संचारधारक दादा वसंत बागल, महेश वसंत बागल तसेच समस्त बागल परिवाराचे सदस्य यांनी भाविक भक्तांच्या सहकार्याने महाप्रसादाचे आयोजन करून वाटप केले.
कोरोनाचे नियम शिथिल केलेले असतानादेखील बहुतांश भक्त भाविकांनी स्वच्छेने मास्क घालून सामाजिक अंतराचे पालन केल्याचे ठळकपणे जाणवत होते. गुढीपाडव्याच्या निमित्ताने सकाळपासूनच श्री सोमेश्वर मंदिरातील शिवलिंगाचे पूजन करून दर्शन घेण्यासाठी भाविक येत होते. सकाळी सूर्योदयाच्या वेळेस मंदिरासमोर विधिवत पूजन करून गुढी उभारण्यात आली. मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास आरती होऊन अग्निहोम सोहळ्याची सांगता झाली.