Type Here to Get Search Results !

वडगाव निंबाळकरच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत एप्रिलमध्ये च दिवशी ७० पेक्षा जास्त मुले दाखल

वडगाव निंबाळकरच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत एप्रिलमध्ये च दिवशी ७० पेक्षा जास्त मुले दाखल

पंचायत समिती बारामती (शिक्षण विभाग) यांच्या सौजन्याने 'शाळापूर्व तयारी अभियानांतर्गत' वडगाव निंबाळकरच्या ( ता बारामती) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नं.१ व २ मध्ये पहिल्याच मेळाव्यात पहिल्यांदाच एप्रिलमध्येच इयत्ता पहिलीत ७० हून जास्त मुले दाखल झाली.अजून जूनमध्ये शाळा सुरू झाल्यावर पट वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पालकांचा उदंड प्रतिसाद मिळाला.

         नवीनच दाखल झालेल्या मुलांचे ढोल-ताशा,लेझीमचा गजर,रंगीबेरंगी फुगे,नटखट जोकर,विविध शैक्षणिक साहित्याचे स्टॉल,सेल्फी पॉईंटने स्वागत करण्यात आले.
  या प्रवेशोत्सव व बालआनंद मेळाव्यासाठी माजी महसूल उपआयुक्त तसेच सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक शिवाजीराव राजेनिंबाळकर,पंचायत समितीचे माजी उपसभापती प्रदिप(बापू) धापटे,वडगाव निंबाळकर ग्रामपंचायतचे सरपंच सुनिल ढोले,ग्रामपंचायत सदस्य पिंटू किर्वे,सारिका खोमणे,मयुरी साळवे,संजय साळवे,अजित भोसले,केंद्रप्रमुख संजय गायकवाड साहेब,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष.हनुमंत खोमणे, शाळेच्या मुख्याध्यापिका अरुणा आगम,कविता जाधव,उपशिक्षक अनिल गवळी,मालन बोडरे,विजया दगडे,सुनिता पवार,लता लोणकर,राणी ताकवले आणि मोठ्या संख्येने पालक वर्ग उपस्थित होते.
         नवीन दाखल झालेल्या विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद शाळेतील माझे पहिले पाऊल उपक्रमांच्या पावलांच्या ठशांचे प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायतचे सदस्य.राहुल आगम व शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने नवीन दाखल मुलांना वह्या,कंपास,शैक्षणिक साहित्य,पाणीबोटल,खाऊ यांचे मोफत वाटप करण्यात आले.
     जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने राबविलेल्या विविध उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होऊन गुणवत्ता व दर्जा सुधारल्यामुळे मोठ्या प्रमाणात मुले दाखल झाल्याने मान्यवरांनी समाधान व्यक्त केले.
         कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपक्रमशील शिक्षक अनिल गवळी,प्रास्ताविक अरुणा आगम  आणि आभार.कविता जाधव यांनी मानले.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test