Type Here to Get Search Results !

गरजुवंत मुलांसाठी निवासी मोफत अभ्यासिका केंद्र चालु करणार - अध्यक्ष सुनील धिवार.

गरजुवंत मुलांसाठी निवासी मोफत अभ्यासिका केंद्र चालु करणार - अध्यक्ष सुनील धिवार.
सोमेश्वर मनगर - सामान्य कुटुंबातील मुलांनी स्पर्धा परीक्षेत मिळावलेले यश इतरांसाठी प्रेरणादायी आहे असे गौरवोद्गार जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वासराव देवकाते यांनी काढले.
     बहुजन हक्क परिषद महाराष्ट्र युवक अध्यक्ष नानासाहेब मदने यांच्या पुढाकाराने वडगाव निंबाळकर ( ता.बारामती ) येथे तालुक्यातील स्पर्धा परीक्षेत यश मिळवणा-यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता.यावेळी विनोद ताराचंद चव्हाण(सहायक मोटार वाहन निरीक्षक),माधुरी दशरथ जाधव,निलेश बाळासो पोमणे,सुरज सुरेश मोरे (तिघे ही पोलीस उपनिरीक्षक) यांचा शाल श्रीफळ देऊन माजी महसूल आयुक्त शिवाजीराजे राजेनिंबाळकर व बहुजन हक्क परिषद संस्थापक अध्यक्ष सुनील धिवार,तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष संभाजी होळकर यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी सुनिल धिवार म्हणाले की लवकरच बारामती तालुक्यातील ग्रामिण भागात बहुजन हक्क परिषद च्या वतीने  महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षा साठी ज्या मुलां-मुलींची घरची आर्थिक परिस्थिती नाजुक आहे अशा गरजुवंत मुलांसाठी  निवासी मोफत अभ्यासिका केंद्र चालु करण्यात येणार आहे.
  कार्यक्रमाचे स्वागत युवक अध्यक्ष अमोल गायकवाड व जिल्हाध्यक्ष संतोष डुबल यांनी केले
प्रास्तविक संघटनेचे प्रवक्ते अक्षय चाचर,सूत्रसंचालन अभिजीत हिरवे सर व निलेश आगम यांनी केले,तर कार्यक्रमाचे आभार पै.नानासाहेब मदने यांनी मानले.
      यावेळी सुजाता जाधव,कांचन काटे,अलका भंडलकर,तेजश्री भंडलकर,संजय साळवे,अजित भोसले,धनंजय खोमणे,दत्तात्रय खोमणे,भाऊसाहेब खंडागळे,मधुकर शिंदे,बाळासो जाधव,संतोष डुबल,सचिन साठे,निलेश रांगोळे,निलेश मदने,नितीन गायकवाड,उमेश गायकवाड,चांगदेव भंडलकर,सुरज खोमणे,अशोक चव्हाण,पांडुरंग घळगे,नंदकुमार जाधव,दादा निंबाळकर,अरविंद खोमणे,लक्ष्मण चव्हाण,लालासो खोमणे,सतिश साळवे,नागेश जाधव,भाऊसो आगम,गणेश रांगोळे,बापु दरेकर,दादासाहेब आगम,अभिजित साळवे आकाश वाघमारे,मंगेश खोमणे,तेजस जाधव,विशाल चव्हाण,छोटु जाधव,भुषण दरेकर,दिपक भंडलकर,उपस्थित होते.
       
■■■■■■
स्पर्धा परीक्षेत यश मिळवणा-या युवकांचा सत्कार करुन सामाजिक बांधिलकी जोपासली.त्यांच्यासारखे यश इतरांनी मिळवावे हा हेतू सत्कारा मागचा होता.
 नानासाहेब मदने- बहुजन हक्क परिषद युवक अध्यक्ष महाराष्ट्र
         
फोटो ओळी- बहुजन हक्क परिषद यांच्या वतीने स्पर्धा परीक्षेत यश मिळवणा-यांचा सत्कार करताना मान्यवर

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test