महापुरुषांची नावे राज्य शासनाने कागदावर नाही तर कायद्याने घ्यावे -अध्यक्ष दिपकअण्णा काटे.
आझाद मैदानावर आमरण उपोषणचा इशारा.
बारामती - महापुरुषांची नावे राज्य शासनाने कागदावर नाही तर कायद्याने घ्यावे, यासाठी शिवधर्म फाउंडेशनने १४ एप्रिल रोजी इंदापूर ते मंत्रालय अशी पदयात्रा सुरू होती. ही पदयात्रा शनिवारी बारामतीतील इंदापूर रस्त्यावर असणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पुढील पायी प्रवास सुरू केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिवशी शिवधर्म फाउंडेशनने इंदापूर ते मंत्रालय अशी पदयात्रा सुरू करण्यात आली आहे. यामध्ये धर्मवीर संभाजी महाराज, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले, आद्यगुरू लहुजी वस्ताद साळवे, आद्यक्रांतिवीर उमाजी राजे नाईक, शाहीर अण्णाभाऊ साठे या महापुरुषांची नावे १९५० कायद्यान्वये शासनमान्य यादीवर घ्यावी. यासाठी शिवधर्म फाउंडेशन दोन वर्षांपासून पाठपुरावा
करत असून, याबाबत मुंबई उच्च न्यायालयात पीआयएल देखील दाखल केली आहे. या मागणीसाठी इंदापूर ते मंत्रालय पदयात्रा सुरू केली
असून, मुंबई येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबाबत निवेदन देत, यावर शासनाने लवकरात
लवकर निर्णय न घेतल्यास शिवधर्म फाउंडेशन मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार असल्याचे शिवधर्म फाउंडेशनचे अध्यक्ष दीपकअण्णा काटे सांगितले. या वेळी शिवसेना शहराध्यक्ष पप्पू माने, शुभम अहिवळे, मंगलदास निकाळजे,निखिल देवकाते यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.