सर्वांना हनुमान जयंतीच्या शुभेच्छा...
मुंबई :- “श्री प्रभूरामांचे परमभक्त, महापराक्रमी वीर, पवनपुत्र, बजरंगबली हनुमानजी हे अखंड भारतवर्षाचं दैवत, आदर्श आहेत. राज्यात, देशात गावोगावी असलेल्या त्यांच्या देवळांमध्ये आपल्याला शक्ती, भक्ती, युक्ती, त्याग, पराक्रमाचं विश्वरुप दर्शन घडतं. श्रीहनुमानजींचं संपूर्ण जीवन प्रभूश्रीरामांना, सीतामाईंना समर्पित होतं. समर्पित जीवनाचा आदर्श श्रीहनुमानजींनी दाखवला. त्यांच्या जीवनातील प्रसंगांतून संकटांतून मार्ग काढण्याची प्रेरणा, ताकद मिळते. आज हनुमान जयंतीच्या निमित्तानं श्री हनुमानजींना वंदन. सर्वांना हनुमान जयंतीच्या भक्तीपूर्ण शुभेच्छा, ” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रीहनुमानांना जयंतीनिमित्त वंदन केले असून सर्वांना हनुमान जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.