निमगाव केतकी या ठिकाणी सुवर्णयोगेश्वरी पतसंस्था व सुवर्णयुग गणेश मंदिर ट्रस्ट यांच्यावतीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी
इंदापूर प्रतिनिधी दत्तात्रय मिसाळ निमगाव केतकी १४ एप्रिल रोजी सुवर्णयोगेश्वरी पतसंस्था व सुवर्ण गणेश मंदिर ट्रस्ट यांच्या वतीने विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मा. श्री भीमराव बोराटे व मा.श्री अतुल (आप्पा) मिसाळ यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून सुवर्णयोगेश्वरी पतसंस्थेचे चेअरमन श्री मच्छिंद्र (आप्पा) चांदणे, श्री गणेश पतसंस्थेचे चेअरमन किशोर (आबा) पवार, श्री सूर्यकांत महामुनी, श्री अर्जुन घाडगे, श्री मुलांनी सर, पत्रकार श्री मनोहर चांदणे, सोमनाथ राऊत, कांतीलाल शेंडे व इतर मान्यवर तसेच पत संस्थेचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.