... अनावश्यक खर्च टाळत राहुल सोरटे यांनी आगळ्या वेगळ्या पद्धतीत केला वाढदिवस साजरा.
सोमेश्वरनगर - श्री सोमेश्वर साखर कामगार सहकारी पतपेढीचे माजी चेअरमन व नूतन संचालक राहुल सोरटे यांच्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळता तसेच एक सामाजिक उपक्रम तर आपणही समाजाचे काही देणे लागतो अशी संकल्पना ठेवत त्यांनी बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर साखर कारखाना मार्फत चालविल्या जाणाऱ्या कोपीवरील शाळा म्हणजे ...साखर शाळा येथील लहान मुलांना शालेय उपयोगी साहित्य वाटप करण्यात आले.
या प्रसंगी श्री सोमेश्वर सहकारी साखर कामगार पतपेढीचे विद्यमान चेअरमन अजित शिंदे,संदीप लोखंडे,विश्रांत कदम हे उपस्थित होते. त्यावेळी लहान मुलांचे शिक्षक म्हणून शरद सर व सौ.लोखंडे मॅडम उपस्थित होत्या
शुभम लोखंडे या विद्यार्थ्याने सर्व मुलांच्या तर्फे राहुल सोरटे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देऊन आभार व्यक्त केले.