महात्मा फुले यांचे आंतरराष्ट्रीय स्मारक करावे सावता परिषदेचे मागणी
इंदापूर प्रतिनिधी दत्तात्रय मिसाळ - सावता पररिषदेच्यावतीने क्रांतिसूर्य महात्मा फुले यांची १९५ वी जयंती सावता परिषदेच्या संपर्क कार्यालयामध्ये करण्यात आली यावेळी सावता परिषदेचे प्रदेश मुख्य संघटक संतोष राजगुरू बोलत होते आत्ता जे धोरण केंद्र व राज्य शासन राबवत आहे पाणी आडवा पाणी जिरवा हे धोरण त्याकाळी महात्मा फुले यांनी राबवले दीनदयाळ गोर गरीब मागासवर्गीय अल्पसंख्याक समाज शिकला पाहिजे शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि ते आपण केले पाहिजे म्हणून महात्मा फुले यांनी शिक्षणाचा पाया रचला बहुजन समाजामध्ये जनजागृती निर्माण केली आपल्या स्वतःच्या घरापासून शिक्षणाला सुरुवात केली माता सावित्रीबाई फुले यांना शिक्षण देत त्यांना प्रथम शिक्षिका मुख्याध्यापिका केले व समाजात शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले महात्मा फुले यांनी सत्यशोधक धर्माची स्थापना केली व ती आचरणात आणण्यात आली बहुजनांसाठी पुण्यात पाण्याचा हौद खुला केला यावेळी राजगुरूंनी फुलांच्या प्रति सावता परिषदेच्यावतीने भावना व्यक्त केल्या यावेळी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या फोटोची प्रतिमा पूजन केले व त्यांचे विचार आचरणात आणण्याचे एकमताने ठरले या प्रसंगी उपस्थित राष्ट्रवादीचे नेते बापूसाहेब घाडगे अनिल जी राजगुरू दादासाहेब विषय विजय जी महाजन मधुकर जी भूम देविदास जी शेंडे राष्ट्रवादीचे नेते रवी शेंडे देवराज भूम गोरख जी आदलिंगे भारत मुक्ती मोर्चाचे तालुकाध्यक्ष बाबजी भूम उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन सावता परिषदेच्या वतीने करण्यात आले होते