भिगवण येथील इफ्तार पार्टींत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील सहभागी होऊन मुस्लिम बांधवांना दिल्या शुभेच्छा
इंदापुर प्रतिनिधी दत्तात्रय मिसाळ-राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी भिगवन येथील जामा मस्जिदमध्ये आयोजित इफ्तार पार्टींमध्ये दि. २७ एप्रिल रोजी सहभागी होऊन त्यांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या.
हर्षवर्धन पाटील म्हणाले की,' कर्मयोगी शंकररावजी पाटील तथा भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापुर तालुक्याची राजकिय,सामाजिक व सांस्कृतिक जडणघडण झाली आहे. तालुक्याला कर्मयोगींच्या धर्मनिरपेक्ष विचारांचा वारसा लाभलेला आहे. कर्मयोगींच्या धर्मनिरपेक्ष विचारांचा वसा जपण्याचा प्रयत्न केला जाईल. मुस्लिम बांधवांना या निमित्त मनपूर्वक शुभेच्छा.सत्तेमध्ये असताना लुमेवाडी (ता.इंदापुर) येथील दर्ग्याच्या विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न केला, इंदापुर, भिगवण, बावडा आदी ठिकाणच्या मस्जिदीच्या विकासासाठी योगदान दिले. शैक्षणिक व सहकारी संस्थांमध्ये मुस्लीम समाजाला योग्य प्रतिनिधीत्व दिले आहे. विरोधक केवळ राजकिय स्वार्थासाठी गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न करत आहेत.कर्मयोगी शंकरराव पाटील यांचे मार्गदर्शनाखाली मागील सत्तर वर्षांमध्ये मुस्लीम समाजाच्या विकासासाठी दिलेल्या योगदानाचे व प्रामाणिक प्रयत्नांचे समाजाने अवलोकन करावे. कार्यक्रमासाठी भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य मारुतराव वणवे, इंदापुर अर्बन बॅंकेचे संचालक अशोक शिंदे, कर्मयोगीचे संचालक पराग जाधव,पंचायत समितीचे माजी उपसभापती संजय देहाडे, सरपंच तानाजी वायसे, सिराज शेख, संपत बंडगर, प्रा. तुषार क्षिरसागर,तेजस देवकाते,सुनिल वाघ, प्रशांत वाघ, रणजित निकम, जाफर मुलाणी, डॉ.महंमद मुलाणी उपस्थित होते. यावेळी इंदापुर अर्बन बॅंकेचे संचालक अशोक शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक जावेद शेख यांनी केले सुत्रसंचालन मेहमुद मुलाणी यांनी केले. आभार सलीम सय्यद यांनी मानले.कार्यक्रमाचे नियोजन हबीब तांबोळी, रियाज शेख, मौलाना असद, अब्दुल मुलाणी, रियाज बागवान, फिरोझ शेख आदींनी केले.