जिल्हास्तरीय शिकाऊ उमेदवार भरती मेळावा २१ एप्रिल रोजी
पुणे दि.१७-प्रशिक्षण महानिदेशालय नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार देशपातळीवरील शिकाऊ उमेदवारांकरिता जिल्हस्तरीय शिकाऊ उमेदवार भरती मेळाव्याचे आयोजन २१ एप्रिल २०२२ रोजी सकाळी १० वाजता औंध येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या कौशल्य सभागृहात करण्यात आले आहे.
शिकाऊ उमेदवारी भरती योजना ही कुशल कारागीर घडविणारी योजना आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही एक चांगली संधी आहे. आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहकायक प्रशिक्षणार्थी सल्लागार विलास टेके आणि अंशकालीन प्राचार्य बी.आर.शिंपले यांनी केले आहे.