इंदापूर शहरामध्ये होणार १० कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन समारंभ - संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या शुभहस्ते
इंदापूर प्रतिनिधी दत्तात्रय मिसाळ-इंदापूर शहर या ठिकाणी इंदापूर शहरातील आय टी आय नवीन वर्गखोल्या उद्घाटन, इंदापूर तहसील कार्यालयातील अभिलेख कक्ष सेतू कार्यालयाचे उद्घाटन,
इंदापूर शहरांतर्गत चौक सुशोभिकरण व इंदापूर शहरांतर्गत पथदिवे बसविणे तसेच विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन संसदरत्न खासदार मा. सुप्रियाताई सुळे यांच्या शुभहस्ते होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री दत्तात्रय मामा भरणे तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदिप (दादा) गारटकर हे उपस्थित राहणार आहेत. तसेच इंदापूर तालुका व शहरातील सर्व सन्माननीय जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, आजी -माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे आयोजन मा. बाळासाहेब ढवळे, मा. उमाताई इंगळे, मा. इमरान शेख यांनी केले आहे. कार्यक्रम रविवार दिनांक १७/४ /२०२३ रोजी सायंकाळी ५ वाजता इंदापूर शहर या ठिकाणी होणार आहे.