सत्यशोधक प्रतिष्ठान निमगाव केतकी यांच्या वतीने गुरु-शिष्य जयंतीनिमित्त प्रबोधनाचा कार्यक्रम संपन्न
इंदापूर प्रतिनिधी दत्तात्रय मिसाळ -दिनांक 24 एप्रिल निमगाव केतकी तालुका इंदापूर या ठिकाणी राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले व विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या गुरु-शिष्य जयंतीनिमित्त जाहीर प्रबोधनाचा कार्यक्रम सत्यशोधक प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता यामध्ये डॉक्टर श्रीमंत कोकाटे सर व दंगलकार नितीन चंदनशिवे यांच्या विद्रोही कविता यांचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी महापुरुषांच्या इतिहासाचा अभ्यास तरुण पिढीने करावा महापुरुष घडले असल्याने आपली प्रगती झाली आहे आपण जे काही पद प्रतिष्ठा पदावरची आहोत ते फक्त महापुरुषांच्या कृपेने आहोत असे उद्गार श्रीमंत कोकाटे सर यांनी काढले यावेळी इयत्ता चौथीतील विद्यार्थिनी कुमारी सिद्धी बाळासाहेब शिंदे हिने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले यांच्या वरती सुंदरसे भाषण केले श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने संविधानाचे उद्देश पत्रिका देऊन सत्यशोधक प्रतिष्ठान यांचा मान सन्मान करण्यात आला कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून राज्यमंत्री दत्तात्रय मामा भरणे तसेच कर्मयोगी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन दादा पाटील कार्यक्रमाचे उद्घाटक एडवोकेट राहुल मखरे नानासाहेब चव्हाण माजी उपसभापती देवराज भाऊ जाधव निमगाव केतकी ग्रामपंचायत सरपंच प्रविण भैय्या डोंगरे तंटामुक्ती अध्यक्ष अतुल आप्पा मिसाळ बहुजन मुक्ती पार्टी चे बाबासाहेब भोंग बाळासाहेब सरवदे तात्यासाहेब वडापुरे अमर बोराटे सर एडवोकेट श्रीकांत करे माणिक भोंग पत्रकार निलकंठ भोंग इत्यादी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन सत्यशोधक प्रतिष्ठान अध्यक्ष दत्तात्रय मिसाळ कार्याध्यक्ष हनुमंत मिसाळ सदस्य गोपाळ भोंग यांनी केले होते.सूत्रसंचालन प्रतिष्ठानचे सचिव प्रविण डोंगरे यांनी केले तर आभार सुमित मिसाळ यांनी मानले.