सोमेश्वरनगर - बारामतीतील सोमेश्वर विद्यालय सोमेश्वरनगर या शाळेतील २०००/२००१ या कालावधीतील सर्व माजी विद्यार्थ्यांचा मेळावा रविवार दि १० रोजी विद्यालय प्रांगणात संपन्न झाला. विशेष म्हणजे २१ वर्ष्यानी हे एकत्र आले तसेच उपस्थित विद्यार्थ्यांनी त्यांच्या जुन्या आठवणींच्या उजाळा देत केेलेल्या चर्चा व हास्य कल्लोळाने या मेळाव्यात रंगत भरली.या मेळाव्या प्रसंगी माजी विद्यार्थी यांच्या वतीने आव्हान करण्यात आले की इथून पुढे सोमेश्वरनगर परिसरात सामाजिक उपक्रम राबवत दर वर्षी आपण असा आपल्या इयत्तेचा माजी विद्यार्थी मेळावा आयोजित करणार असल्याचे त्यांनी बोलताना सांगितले.
अजित पाटोळे ,दीपक रासकर आणि विद्या शिंदे यांनी या मेळाव्यास परिश्रम घेतले तर प्रवीण गायकवाड , तानाजी हाके ,दीपक पाटोळे ,विशाल गायकवाड ,किरण चौधरी, राणी मोहिते, नूतन चव्हाण, रंजीत जगताप आशा एकूण वीस विद्यार्थी - विद्यार्थीनी उपस्थिती दर्शवली.