सोमेश्वरनगर ! बारामती प्रभात या वृत्तपत्राचा प्रथम वर्धापनदिन मोठया थाटात संपन्न.
सोमेश्वरनगर प्रतिनिधी - सोमेश्वरनगर (ता. बारामती )येथे मराठी नवीन वर्ष गुढीपाडवा या दिवशी बारामती प्रभात या वृत्तपत्राचा प्रथम वर्धापनदिन शनिवार 2 रोजी सकाळी मोठ्या थाटात संपन्न झाला ,हा वर्धापन श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम जगताप यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी बोलताना बारामती प्रभात च्या माध्यमातून सामाजिक , शैक्षणिक , राजकीय तसेच सामान्य जनतेचे प्रश्न वृत्तपत्राच्या माध्यमातुन न्याय द्यावा व गुढीपाडवा च्या उपस्थित मान्यवरांना शुभेच्छा अध्यक्ष जगताप यांनी दिल्या.
याप्रसंगी चेअरमन पुरुषोत्तम जगताप ,
आजी माजी सैनिक संघटना अध्यक्ष बाळासाहेब शेंडकर,विवेकानंद अभ्यासिका अध्यक्ष गणेश सावंत, भारतीय पत्रकार संघ तालुका अध्यक्ष काशीनाथ पिंगळे, निखिल नाटकर, महंमद शेख,अमोल जगताप, बाळासाहेब जगताप सह सोमेश्वर परिसरातील मान्यवर उपस्थित होते.
मनोगत भारतीय पत्रकार संघाचे अध्यक्ष व दैनिक पुढारी चे पत्रकार काशिनाथ पिंगळे यांनी केले तर
वेळात वेळ काढून नियोजित बारामती प्रभात या वृत्तपत्राच्या प्रथम वर्धापन दिनी शुभेच्छा व उपस्थिती दर्शवल्याने सर्वच मान्यवरांचे आभार बारामती प्रभात संपादक विनोद गोलांडे यांनी मानले.