लोणावळा ! चेत्री यात्रेतील खुनाच्या गुन्हयातील आरोपींना निष्पन्न करून आरोपींना गजाआड करण्यात लोणावळा ग्रामीण पोलीसांना यश.
पुणे जिल्हयातील लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे हद्दीमध्ये दि. ०९/०४/२०२२ रोजी रात्री
०१:०० वा. चे सुमारास मौजे येहेरगांव ता. मावळ जि. पुणे गावचे हद्दीमध्ये पायथा मंदीराये गयाळील एकविरा मेन गेटजवळ यात्रेत चाललेला खेळ पहात असताना इसम कार्तिक म्हात्रे, कोपरीगाव ठाणे याचा मोबाईल चोरीस गेला. त्यामुळे राहुल पाटील व त्याचे सहकारी सर्व रा. कोपरीगांव ठाणे यांनी त्या खेळ करणारे लोकांचेकडे आमचा मोबाईल फोन चोरीस गेला आहे. तो तुम्ही व तुमच्याच लोकांनी घेतला आहे का .असे विचारलेचे कारणावरुन सदर लोकांनी संगनमत तक्रारदार व त्याचे सहकारी यांना शिवीगाळ करुण बांबुने मारहाण करुण व तिक्ष्ण हत्याराने खुपसून वार करुन त्यांचेतील हर्षल पाटील यास जखमी करून राहुल पाटील यास जिवे मारण्याचा प्रयत्न करुण मनोज कुंडलिक पाटील वय ४९ राधे रा. कोपरगांव ठाणे याचे डावे
छातीमध्ये कोणत्यातरी तिक्ष्ण हत्याराने खूपसून ठार करुन त्याचा गुन करुन पळून गेले होते. सदर जसगी इसमांस त्वरीत रूग्णालयात दाखल करण्यात आले परंतु तो मयत झाल्याचे घोषित करण्यात आले. सदर याबाबत तक्रार राहुल भास्कर पाटील रा. कोपरीगांव ठाणे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन तात्काळ अनोळयी ४ लोकांचेविरुध लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा रणि नं. ५३/२०२२, ३०२,३०७,३२४,३२३,५०४,३४ भा.द.वि. प्रमाणे ग व खुनाचा प्रयत्न या सदराखाली गुन्हा दाखल करण्यात आला. यात्रेत घडलेल्या प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेवुन गुन्हा दाखल होताच गुन्हयाये स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पुणे ग्रामीणचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके व लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रविण मोरे यांनी त्यांचेकडील अधिकारी व पोलीस स्टाफसह स्टाफ व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाया पुणे यांचेकडील टीमसह घटनास्थळी भेट देवून घटनास्थळाची बारकाई पहाणी करुन मिळालेल्य माहितीच्या आधारे दोन समन्वयाने पथके तयार करुन आरोपी शोध कामी त्वरीत रवाना केले. व आरोपीबाबत कौशल्याने माहिती प्राप्त करून त्यांचा ठावठिकाणा व शोध सुरू केला. गोपनीय माहिती आधारे घेतलेला शोध यावरून इसम नामे प्रविण धर्माजी पाटील रा. जि रायगड यास शिताफीने ताब्यात घेवून त्यास विश्वासात घेवून केले चौकशीमध्ये त्याने साथीदारां सह गुन्हा केल्याचे कबूल केले. तसेच त्याचे बरोबर इतर साथीदार असल्याचे निष्पन्न झाल्याने सहआरोपी अजय प्रविण पाटील रा.पेण जि रायगड यालाही ताब्यात घेण्यात आले. सदर गंभीर स्वरूपाचा गुन्हा घडलेपासून २४ तासाचे आत कौशल्य व धाडसाने निष्पन्न करुन दोन आरोपींना गुन्हयाचेकामी दि. ०९/०४/२०२२ रोजी अटक करण्यात लोणावळा ग्रामीण पोलीसांना यश आले आहे. अटक केलेल्या आरोपीना मा. न्यायालयासमोर हजर करुन त्यांची पोलीस कोटडी रिमांड घेवून सदर गुन्हयाचा तपास चालु आहे. सहभागी असलेल्या इतर आरोपींचा शोध घेवून तसेय यांचेविरुध्द या आगोदर अशाप्रकारचे अगर इतर गुन्हे दाखल आहेत काय याबाबत लोणवळा ग्रामीण पोलीस अधिक तपास करीत आहेत. यात्रे दरम्याण घडलेला गंभीर गुन्हा लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे
यांनी समन्चयाने तात्काळ उघडकीस आणलेला आहे. यात्रेकरू यांची सुरक्षीतता व तपासाचे दृष्टीने सदर बाब अत्यंत महत्त्वाची ठरली आहे.
सदरची कामगीरी ही मा. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, मा. अपर पोलीस अधीक्षक .
मितेश गट्टे, मा. लोणावळा उप विभागाचे अधिकारी,राजेंद्र पाटील, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पुणे ग्रामीणचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांचे मार्गदर्शनात लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रविण बा. मोरे, सहा. पोलीस निरीक्षक सचिन राऊळ, पोलीस उपनिरीक्षक सचिन बनकर, सहा. फौजदार सिताराम योकड, युवराज बनसोडे, कुतुयुद्दीन खान, पोलीस हवा, शकील शेख, पोहया महेट सपकाळ,
पोलीस नाईक शरद जाधवर, किशोर पवार, नितीन कदम, पोशि केतन तळपे, पोशि नागेश कमठणकर तसेच पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहा. फौजदार प्रकाश वाघमारे, पोलीस अंमलदार प्राण येवले यांनी समन्चयाने केली आहे.