सत्यशोधक प्रतिष्ठान निमगांव केतकी यांच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
इंदापुर प्रतिनिधी दत्तात्रय मिसाळ निमगाव केतकी दि. १४ एप्रिल २०२२ रोजी सत्यशोधक प्रतिष्ठान यांच्या वतीने विश्वरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त श्री संत सावतामाळी चौक या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेचे पूजन डॉ. स्वप्नील देवकाते यांच्या हस्ते करण्यात आले. व त्यानंतर जयंतीनिमित्त पेढे वाटप करण्यात आले. तसेच जय भीमनगर, श्री केतकेश्वर विद्यालय, नरसिंह प्रतिष्ठान, ग्रामपंचायत कार्यालय यांच्या वतीने देखील जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून निमगाव केतकी ग्रामपंचायत सरपंच प्रवीण (भैय्या) डोंगरे, तंटामुक्ती अध्यक्ष अतुल (आप्पा) मिसाळ, जय भिम मित्र मंडळाचे अध्यक्ष नवनाथ मिसाळ, पै. रणधीर मिसाळ, सामाजिक कार्यकर्ते अमोल राऊत, रोशन मिसाळ, ग्रामपंचायत सदस्य सागर मिसाळ, अमोल हेगडे, राजू भोंग, मच्छिंद्र आदलिंग, अक्रम शेख माजी ग्रामपंचायत सदस्य गोपाळ भोंग, नितीन मिसाळ गुरुजी, प्रसाद मिसाळ, पवन मिसाळ, सिद्धार्थ मिसाळ, दादासाहेब आदलिंग, अनिकेत मिसाळ, पप्पू मिसाळ आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा. श्री दत्तासाहेब मिसाळ, उपाध्यक्ष निलखंठ भोंग, सचिव प्रवीण (अण्णा) डोंगरे, कार्याध्यक्ष हनुमंत मिसाळ सदस्य बंटी मिसाळ यांनी केले होते.