सोमेश्वरनगर ! हिवरे बाजार येथील गावच्या विकासाबाबत माहिती घेत सोरटेवाडी ग्रामस्थांकडून अभ्यास दौरा
बारामतीतील सोरटेवाडी एक आदर्श गाव करण्याचा संकल्प.
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील सोरटेवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील ग्रामस्थ, तरुण शेतकरी व महिलांसाठी अभ्यास दौरा आयोजित केला होता. या दौऱ्यातप्रसंगी इतर जिल्यातील विविध धार्मिक स्थळांसह आदर्श गाव म्हणून हिवरे बाजारचा दौरा करण्यात आला असे बोलताना सरपंच शेंडकर यांनी सांगितले तसेच पुढे बोलताना म्हणाले की हिवरे बाजार येथील गावच्या विकासाबाबत
माहिती घेत दौऱ्या प्रसंगी अतिमहत्त्वाचे म्हणजे पाणी साठवणूक उपक्रमाबाबत , गावच्या
स्वच्छतेच्या नियोजनाबाबत माहिती घेऊन हिवरे गावातील असलेले उपक्रम आपल्या गावात राबविणार असल्यासही सरपंच शेंडकर आणि ग्रामस्थांनी सांगितले. सध्या गरज असणारी पाणी बचत, आरोग्य, स्वच्छता, रस्ते,शाळा, वृक्षसंवर्धन, शेती आणि मशागत, पिकांची लागवड, पावसाळ्यातील पाणी साठवून ठेवण्याची सुविधा आदी योजना व ग्रामस्थांची असलेली एकी आदी उपक्रम राबवत बारामतीतील सोरटेवाडी एक आदर्श गाव करण्याचा संकल्प ग्रामस्थांनी या दौऱ्यात प्रसंगी मनी बाळगला तसेच या अभ्यास दौऱ्यात ५५ महिला व ३० ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्य यांनी सहभाग नोंदवला होता. ग्रामस्थांनी
नाशिक व त्र्यंबकेश्वर या स्थळी आवर्जून भेट दिली. महिलांनी या दौऱ्यातछान माहिती मिळाली असल्याचे बोलताना सांगितले. शेतकरीअभ्यास दौऱ्यात सर्व गावकऱ्यांनी हिवरे बाजार येथे भेट दिली. त्यांनी केलेल्या विकासकामाची पाहणी केली.आमचे गाव प्रगतीकडे नेण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असून, ग्रामस्थांच्या सहकार्याने गावात जास्तीत जास्त विकासकामे करीत गावची प्रगती करू, असा आश्वासन सोरटेवाडी सरपंच दत्तात्रय शेंडकर यांनी दिला तर बारामती तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात एक आदर्श गाव म्हणून ठसा उमठावणार असल्याचे असे बोलताना सांगितले.