बारामती ! क-हावागज रोड येथे वंचित बहुजन आघाडी माळेगांव शाखा नामफलकाचे अनावरण जिल्हा महासचिव मंगलदास निकाळजे यांच्या शुभ हस्ते…
माळेगाव : दि.३ वंचित बहुजन आघाडी आगामी माळेगाव नगर पंचायतीची निवडणूक पुर्ण ताकदीने लढवणार आहे अशी माहिती पुणे जिल्हा महासचिव मंगलदास निकाळजे यांनी दिली. क-हावागज रोड येथे वंचित बहुजन आघाडी माळेगांव शाखा नामफलकाचे अनावरण जिल्हा महासचिव मंगलदास निकाळजे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बारामती शहर अध्यक्ष जितेंद्र कवडे,सम्यक विद्यार्थी आघाडी बारामती तालुका अध्यक्ष रोहित भोसले,संघटक सुरज गव्हाळे, तालुका अध्यक्ष रोहित पिल्ले, विक्रम थोरात उपस्थित होते.यावेळी बोलताना महासचिव मंगलदास निकाळजे म्हणाले की,श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर यांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी बारामती तालुक्यातील गाव तिथे शाखा हा उपक्रम राबवुन वंचित बहुजन आघाडीचा पसार करणार आहे.या कार्यक्रमाचे आयोजन वंचित बहुजन आघाडी माळेगाव शाखा अध्यक्ष आण्णा घोडके, उपाध्यक्ष प्रशांत ढोबळे, दत्तात्रय सोनवणे, रामभाऊ सोलनकर, अमोल भोसले, भानुदास भिसे, अविनाश वाघमारे, प्रल्हाद शिंदे,भारत सोनवणे, विलास भोसले, विशाल घोडके यांनी केले होते.