‘Not me, but you’ माझ्यासाठी नव्हे, तर तुमच्यासाठी हे ब्रीदवाक्य लक्षात घेऊन आम्ही काम करतो...!
बारामती - डेलोनिक्स सोसायटीचे बारामती कॉलेज ऑफ फार्मसी व डॉ बाबासाहेब आंबेडकर टेकनॉलॉजिकल युनिव्हर्सिटी लोणेरे यांच्या संयुक्त विद्यमाने सात दिवसीय विशेष श्रमदान शिबीराचे आयोजन उंडवडी या ठिकाणी १० मार्च ते १६ मार्च २०२२ पर्यंत आयोजित करण्यात आले होते.
या शिबीराचे उद्घाटन प्रसिद्घ पर्यावरण प्रेमी डॉ.महेश गायकवाड व आर्ट ऑफ लिव्हिंग टीचर डॉ .रणजीत फुले व संस्थेचे विश्वस्त डॉ . रुपेश माने व बाळासाहेब कोकरे यांच्या हस्ते करण्यात आले.
पर्यावरणाचा होत चाललेला ऱ्हास व त्यास कारणीभूत असणाऱ्या बाबींची माहिती डॉ.गायकवाड यांनी यावेळी करत असताना आपण निसर्गोपयोगी कार्य कसे केले पाहिजे या वर देखील भाष्य केले. तर डॉ .रणजीत फुले यांनी बदलत चाललेली आहार पद्धत व त्याचे होणारे दूरगामी परिणाम या वेळी या ठिकाणी सांगितले.
या शिबीराची सांगता.गणेश मधुकर सरोदे व दयानंद अवघडे (सामजिक वनीकरण परिक्षेञ , बारामती) यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. या शिबिरात केलेल्या कामामुळे या परिसराचा कायापालट झाल्याचे या वेळी सरोदे यांनी संगीतले. तर अवघडे यांनी स्वयंसेवकांचे भरभरून कौतुक केले.
अलीकडच्या काळात समाजात वेगवेगळ्या विचित्र घटना घडताना आपण पाहत आहोत. अशा परिस्थितीत आजचा तरुण कुठे तरी भरकटत जाऊ नये म्हणून राष्ट्रीय सेवा योजना या उपक्रमातून समाजपरिवर्तन करण्याचे कार्य आज राष्ट्रीय सेवा योजनेचा तरुण करीत आहे असे मत प्राचार्य डॉ राजेंद्र पाटील यांनी व्यक्त केले .
‘Not me, but you’ माझ्यासाठी नव्हे, तर तुमच्यासाठी हे ब्रीदवाक्य लक्षात घेऊन राष्ट्रीय सेवा योजनेची स्वयंसेवक सेवेची मूल्ये आणि सामाजिक भान ठेवून समाजसेवेसाठी तत्पर असतो. आपले उज्ज्वल भविष्य गाठत असतानाच समाज व राष्ट्राला आपण काही देणे लागतो या माध्यमातून राष्ट्रीय सेवा योजना उपक्रमाद्वारे राष्ट्रसेवा करण्याचे कार्य महाविद्यालयीन युवक करीत असतो. राष्ट्रीय सेवा योजनेच्या बोधचिन्हाप्रमाणे आजचा स्वयंसेवक हा बोधचिन्हाच्या आठ आरेनुसार अष्टौप्रहर समाजसेवेसाठी बांधील आहे व लाल रंग हे तरुणांचे सळसळते रक्त हे राष्ट्र उभारणीसाठी असल्याचे दिसून येते असे मत कार्यक्रम अधिकारी प्रा श्रीकृष्ण बावकर यांनी व्यक्त केले .
या विशेष श्रमदान शिबीरामध्ये कॅम्प परिसराची साफ सफाई करणे, झाडांच्या बुडातील सफाई करुन आळे दुरूस्ती करणे, शेततळ्यासाठी लहान-मोठे बांध घालणे, शेततळ्यासाठी लहान दोन तलावांचा भरावा दुरूस्ती करणे, घन वन तयार करण्यासाठी १०० झाडांचे खड्डे घेऊन त्यात काळी माती टाकणे, वृक्षारोपण करून १०० वृक्षांचे घन वन तयार करणे, कंपोस्ट खत तयार करणे व स्मशानभूमी परिसराची स्वच्छता करणे, टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू तयार करणे (रोपवाटीका तयार करण्यासाठी दुधाच्या वापारलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या मध्ये माती भरणे) अशा प्रकारच्या विविध कार्यानचा समावेश होता.
शिवाजी अवचर (सर्पमित्र , इंदापूर), प्रा अमोल महाराज सूळ (मोटिवेशनल स्पीकर, नातेपुते), प्रशांत मुथा (अध्यक्ष - एक मिञ एक वृक्ष, संस्था, दौंड), भीमा वाघचौरे (निसर्ग स्पर्श फौंडेशन , दौंड), इरावती माजगावकर (पी एच डी स्कॉलर , बंगलोर), श्री संजय तात्यासो कोकरे (PSI , उंडवडी), डॉ ज्ञानेश्वर पवार (मेडिकल प्रॅक्टिशनर व आर्ट ऑफ लिविंग प्रशिक्षक,बारामती), राजेंद्र राऊत (मुख्य प्रशिक्षक यशदा ट्रैनिंग सेन्टर, पुणे) सोमनाथ कदम (पत्रकार, दैनिक प्रभात) डॉ. राजेंद्र दळवी (सहाय्यक प्राध्यापक,विद्या प्रतिष्ठान) या मान्यवरांनी शिबीरात विध्यार्थाना विविध विषयांवर प्रबोधनपर मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाच्या विशेष आयोजनासाठी कार्य हीच ओळख फौंडेशन चे अध्यक्ष समीर बावकर व धर्मरक्षण ग्रुपचे सागर जाधव यांनी अतोनात कष्ट घेऊन सर्वोतोपरी सहकार्य केले.
संस्थेचे अध्यक्ष , उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार व सर्व विश्वस्त, डॉ धनंजय घोडके, डॉ दत्तात्रय कातुरे, प्रा कवीता माने, प्रा अतुल भुजबळ तसेच इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते.