बारामती ! बारामतीत भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष,लाडू वाटून केला आनंद साजरा...
बारामती:-उत्तरप्रदेश ,उत्तराखंड ,मणिपूर आणि गोवा राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे सरकार होत आहे पंजाब मध्ये सुद्धा पक्षाच्या मताधिक्यात भरघोस वाढ झाली आहे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्यावर जनतेने प्रचंड विश्वास दाखविला त्यामुळेच आज आपल्याला पुन्हा एकदा आपण एका बलाढ्य पक्षाचे आनंदोत्सव साजरा करण्यास मिळत आहे हे यश संपूर्ण भारतातील सर्व कार्यकर्त्यांचे असून भाजपा पक्षाचे कार्यकर्ते असल्याचा सार्थ अभिमान असल्याने बारामतीत आज दिनांक 10/03/2022 रोजी भारतीय जनता पार्टी कार्यालय बारामती येथे प्रथम आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी पक्ष कार्यालयापासून भिगवण चौक येथे 'ढोल ताश्या च्या गजरात फेरी काढत घोषणाबाजी करीत व लाडू वाटून आनंद साजरा केला या वेळी मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांच्यात जल्लोष पाहायला मिळाला यावेळी श्री अविनाश मोटे सरचिटणीस पुणे जिल्हा, भाजप ,श्री पांडुरंग(मामा) कचरे-तालुका अध्यक्ष,भा.ज. पा. बारामती,श्री सतीशजी फाळके-शहर अध्यक्ष.भा.ज.पा.बारामती,गोविंद देवकाते-पुणे जिल्हा उपाध्यक्ष ग्रामीण, शहाजी कदम-सरचिटणीस पुणे जिल्हा ग्रामीण,सचिन साबळे-सदस्य अनुसूचित जाती,ऍड ज्ञानेश्वर माने-तालुका अध्यक्ष-युवा मोर्चा भाजप,श्री. संतोष जाधव -सचिव बारामती शहर भाजप,राजेश कांबळे-मा अध्यक्ष बारामती तालुका भाजपा,सुधाकर पांढरे-शहर उपाध्यक्ष बारामती भाजपा, धनंजय गवारे-अध्यक्ष किसान मोर्चा बारामती तालुका भाजपा,अक्षय गायकवाड-सहसंयोजक सोशल मीडिया प्रदेश,प्रमोद डिंबळे-पाटील- सोशल मीडिया अध्यक्ष बारामती शहर भाजपा,सुनीताताई झेंडे, सारीकाताई लोंढे,अश्विनी ताई साबळे, संदीप अभंग,निरंजन जवारे,संदीप केसकर,रघु चौधर-
कार्यालय मंत्री भारतीय जनता पार्टी बारामती व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.