Type Here to Get Search Results !

इंदापूर ! इंदापूर तालुक्यामध्ये राज्यमंत्री दत्तामामा भरणे यांच्या कडून विकासकामांचा पाऊस कोटी रुपयांची कामे मंजूर

इंदापूर ! इंदापूर तालुक्यामध्ये राज्यमंत्री दत्तामामा भरणे यांच्या कडून विकासकामांचा पाऊस कोटी रुपयांची कामे मंजूर
इंदापूर प्रतिनिधी दत्तात्रय मिसाळ - इंदापूर तालुक्यामध्ये दत्तात्रयमामा भरणे यांच्याकडून विकासकामांचा पाऊस काटी रुपयांची कामे मंजूर रेडा- रेडणी रस्ता ३ कोटी रुपये, वरकुटे- काटी- निरा भीमा साखर कारखाना ६ कोटी ११ लाख रुपये, काटी ओढ्यावरील फुल १ कोटी व इतर विकास कामे तसेच गिरवी येथील ५ कोटी ६२ लाख रुपये या कामांच्या भूमिपूजन उद्घाटन सोहळा राज्यमंत्री दत्तामामा भरणे यांच्या हस्ते रविवार दिनांक २७/ ३ /२०२२ रोजी दुपारी १ वाजता. गिरवी या ठिकाणी होणार आहे. व तसेच याच ठिकाणी जाहीर सभा होणार आहे. त्यानंतर सायंकाळी ७ वाजता काटी या ठिकाणी जाहीर सभा होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप (दादा) गारटकर तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रताप (आबा) पाटील, प्रवीण (भैय्या) माने, अभिजीत (भैया) तांबिले, प्रशांत (बापू) पाटील, हनुमंत कोकाटे, सचिन सपकाळ, अतुल झगडे, शुभम निंबाळकर, छायाताई पडसळकर हे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे आयोजन मौजे काटी व गिरवी येथील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य संचालक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test