विश्वरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती अध्यक्षपदी अँँड.किरणजी लोंढे.
इंदापूर तालुका प्रतिनिधी दत्तात्रय मिसाळ-
विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती इंदापूर सन २०२२-२३ च्या अध्यक्षपदी एडवोकेट किरणजी लोंढे यांची निवड,इंदापूर शहर आंबेडकर नगर या ठिकाणी समाजबांधवांची जयंतीनिमित्तची मीटिंग संपन्न झाली. व यामध्ये अध्यक्ष म्हणून ॲड. किरण लोंढे, उपाध्यक्ष -महेश सरवदे, सचिव- रोहित अनिल मखरे, सहसचिव -रोहन मखरे, खजिनदार- एडवोकेट सुरज मुखरे, कार्याध्यक्ष- परमेश्वर (दादा) मुखरे, कार्याध्यक्ष- दीपक चव्हाण, यांची निवड समाज बांधवांच्या वतीने करण्यात आली आहे. यामध्ये १४ एप्रिल रोजी प्रतिमेचे पूजन आणि शहरातून प्रभात फेरी तसेच २४ एप्रिल पासून २९ एप्रिल पर्यंत बहुजन महापुरुषांच्या विचारांचा जागर म्हणून प्रबोधन पर कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. व भव्य मिरवणूक 30 एप्रिल रोजी होणार आहे तरी सर्व समाजातील बांधवांनी कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे असे आव्हान अध्यक्ष यांनी केले आहे.