महत्वाची बातमी.... अखेर शिक्षकांच्या रजा मंजूर होणार
शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड यांच्या आदेशाने दिलासा
बारामती - पुणे जिल्हा परिषद जिल्हास्तरावर प्राथमिक शिक्षकांचे तीनशेहून अधिक रजा प्रस्ताव मागील वर्षभरापासून रखडले होते, रजा प्रस्तावांना तातडीने मंजुरी घेण्याची सूचना शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड यांनी शिक्षण विभागास दिल्याची माहिती शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मारणे यांनी दिली
मागील वर्षी मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी २५ जानेवारी २०२१ रोजी जिल्हास्तरावरील सर्व खातेप्रमुख तसेच तालुका स्तरावरील गटविकास अधिकारी व कार्यालयीन प्रमुख यांचे अधिकार काढून घेतले होते, या काळात तालुकास्तरावरील गट विकास अधिकारी व गट शिक्षणाधिकारी यांना शिक्षकांच्या रजा मंजुरीचे अधिकार नसल्याने सदरचे प्रस्ताव मंजुरीसाठी जिल्हा परिषदेकडे पाठवण्यात आले होते. ८ फेब्रुवारी २०२२ रोजी हे अधिकार पूर्ववत देण्यात आले मात्र ८ फेब्रुवारी पूर्वीच्या रजा मंजुरीचे अधिकार जिल्हास्तरावरच असल्याने वर्षभरापासून हे प्रस्ताव धूळ खात पडले होते, यामध्ये अर्जित रजा, विशेष सवलत रजा, देय अनुदेय रजा, बी.एड.रजा यांचा समावेश आहे
पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाने सोमवारी शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड यांची भेट घेऊन ३१ मार्चपूर्वी सदरचे प्रस्ताव मंजूर करण्याची जोरदार मागणी केली आहे, याबाबत शिक्षण सभापती रणजितदादा शिवतरे व प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला होता , शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड मॅडम यांनी रजा प्रस्तावांचा आढावा घेतला असून सामान्य प्रशासन विभागातील प्रस्ताव दोन दिवसात तर शिक्षण विभागातील प्रस्तावांना पुढील चार दिवसात तातडीने मंजुरीसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन शिक्षक संघास दिले आहे त्यामुळे जिल्हाभरातील शिक्षकांना दिलासा मिळणार असल्याची माहिती जिल्हा शिक्षक संघाचे सरचिटणीस खंडेराव ढोबळे यांनी दिली