मुंबई ! 'दिलखुलास’ कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुलाखतीचे पुनर्प्रसारण
मुंबई, 'दिलखुलास' या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्या विशेष मुलाखतीचे पुनर्प्रसारण होणार आहे.
ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून तसेच ‘न्यूज ऑन एआयआर' या मोबाईल ॲपवर शुक्रवार दि.१८ मार्च, शनिवार दि.१९ मार्च आणि सोमवार दि.२१ मार्च २०२२ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होईल. ज्येष्ठ पत्रकार संजय जोग यांनी ही मुलाखत घेतली आहे.
राज्याच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेऊन वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी मांडलेल्या २०२२-२३ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पातून कृषी, आरोग्य, मनुष्यबळ विकास, दळणवळण, उद्योग क्षेत्राच्या विकासाची पंचसूत्री मांडली आहे. राज्य शासनाचा विकासाचा महामार्ग कसा असेल याबाबत सविस्तर माहिती उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी 'दिलखुलास' या कार्यक्रमातून दिली आहे