इंदापूर ! इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे अध्यक्ष हनुमंत कोकाटे यांच्या हस्ते तालुका सरचिटणीसपदी नानासो भोईटे तर संघटकपदी नूरमहमंद शेख यांची निवड.
इंदापूर - इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सरचिटणीसपदी नानासो भोईटे व संघटक पदी नूरमहमंद शेख यांची निवड करण्यात आली. निवडीचे पत्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे यांच्या हस्ते देण्यात आले.
यावेळी बोलताना भोईटे व शेख यांनी सांगितले की, राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, दत्तात्रय भरणे तसेच जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या मार्गदर्शन व नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्य व ध्येय धोरण सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तसेच सामाजिक कार्यामध्ये भाग घेऊन लोकांना मदत करणे तसेच पक्ष संघटना मजबूत करणे कामी भरीव योगदान देणारा असून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
यावेळी राष्ट्रवादी पदवीधर सेलचे अध्यक्ष रमेश पाटील, पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवकचे सरचिटणीस प्रफुल्ल पवार, राष्ट्रवादी तालुका उपाध्यक्ष संजय देवकर, राष्ट्रवादी युवक उपाध्यक्ष अक्षय कोकाटे, महिला राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्षा छाया पडसळकर, विठ्ठल महाडिक, सुनील मोहिते, सुखदेव निकम, समाधान बोडके, चंद्रकांत गलांडे आदी उपस्थित होते.