इंदापूर ! न्यू होम मिनिस्टर हा कार्यक्रम घेऊन शिवशंभु प्रतिष्ठान यांच्यावतीने इंदापूर याठिकाणी महिला दिन उत्साहात साजरा
इंदापूर प्रतिनिधी - शिवशंभी प्रतिष्ठान इंदापूर च्या वतीने महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रम वेळी महिलांना साठी न्यू होम मिनीस्टर हा कार्यक्रम घेण्यात आला.या कार्यक्रमा महिलांचे विविध खेळ घेण्यात आले.तसेच या मध्ये नृत्य,महिला दिनाची माहिती,महिलांना वृक्ष वाटप व येणार्या प्रत्येक महिलेचा सन्मान करण्यात आला.
तसेच इंदापूर मधिल महिला पोलिस,नगरपालिका कर्मचारी,सरकारी हॉस्पिटल कर्मचारी व इंदापूर नगरपलीकेच्या नगराध्यक्षा अंकिता ताई शहा वैष्णवी सूर्यवंशी यांचा सावित्रींच्या लेकिंचा म्हणून सन्मान करण्यात आला.
तसेच या वेळी उपस्थित नगराध्यक्षा अंकिता ताई शहा,नायब तहसीलदार निर्मला शिंदे(मखरे) यांच्या हस्ते महामानवांचे प्रतिमेचे पूजन करुन कार्यक्रमाला सुरवात केली.
या वेळी उपस्थित माता भगिनी व ज्यांनी या कार्यक्रमासाठी सहकार्य केले तसेच शिवशंभो प्रतिष्ठान च्या सदस्यांनी जे कठिण परिश्रम घेतले त्या साथी शिवशंभो प्रतिष्ठान चे अध्यक्ष चि.शुभम पोपट पवार यांनी आभार मानले.
हा कार्यक्रम शिवशंभो प्रतिष्ठान चे मार्गदर्शक मा.श्री पोपट (नाना )पवार यांच्या मार्गदर्शना खाली घेण्यात आला होता.
न्यू होम मिनीस्टर याचे निर्मेता साहेबराव जाधव व दादा कोंडके यांची मिमीक्री करणारे शंकर सूर्यवंशी यांनी ह्या कार्यक्रमात महत्वाची भुमिका पार पडली.
तसेच यावेळी चेतन ढावरे यांची उपनिरिक्षक म्हणून निवड झाली त्या बद्दल त्यांचा ही सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमासाठी इंदापूर शहरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.