विरोधकांनी आता विश्रांती घेतली पाहिजे जनतेने त्यांना विश्रांती दिलेली आहे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे नाव न घेता राज्यमंत्री दत्तामामा भरणे यांनी केली टीका.
इंदापूर प्रतिनिधी दत्तात्रय मिसाळ - गोखळी या ठिकाणी ७ कोटी ७५ लाख निधीच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन उद्घाटन सोहळा संपन्न झाला. यावेळी कार्यकर्त्यांनी माझी स्तुती करून माझी जबाबदारी वाढवली आहे. मी जरी गोखळी गावकऱ्यांना वेळ दिला नसला. तरी आपण मला ज्या ज्या वेळेस भेटला त्या त्या वेळेस मी आपले सर्व कामे केली आहेत. घरच्या माणसांना केलेली मदत ही सांगायची नसते. जे सांगतात ते घरचे नसतात. निधी आणण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. हे काही येड्या गबाळ्याचे काम नाही. मी कधी गटाचा -तटाचा माझ्या जवळचा लांबचा विचार करत नाही. चे काम मला होणार आहे. ते मी लगेच करून टाकतो. जे होत नसेल ते स्पष्टपणे नाही म्हणून सांगतो. जीवनामध्ये येऊन असे काम करा की लोकांनी कायम तुमचे नाव घेतले पाहिजे. खरा शेतकरी तर मीच आहे. विरोधकांना आता विश्रांती घेतली पाहिजे. जनतेने त्यांना विश्रांती दिलेली आहे. शेवटी वाईट काम करणारच वाईट होतं. राज्यामध्ये सर्वात जास्त निधी मी इंदापूर तालुक्यासाठी आणलेला आहे. तालुक्यामधील एक किलोमीटरचा देखील रस्ता शिल्लक राहणार नाही. एवढा निधी मिळालेला आहे. मी वन मंत्री असतानादेखील एकदा देखील ताडोबाला गेलो नाही. मला ज्या दिवशी सुट्टी असते. त्यादिवशी मी इंदापूरातल्या लोकांना भेटल्याशिवाय मला करमत नाही. विकास माझ्या रक्तातच आहे. गोरगरीब मागासवर्गीय लोकांची कामे केल्यानंतर ती लोक आपल्याला विसरणार नाहीत. याची मला खात्री आहे. असे राज्यमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी सांगितले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदिप दादा गारटकर म्हणाले की, इतका निधी तालुक्यामध्ये आणून खरी विकासाची धुळवड तर मामांनीच केली आहे.या वेळी माजी सभापती प्रशांत (बापू) पाटील, प्रवीण (भैय्या) माने, अभिजीत (भैया) तांबिले, हनुमंत (आबा) कोकाटे, डॉक्टर शशिकांत तरंगे, अतुल झगडे, यांनी मार्गदर्शन केले. यावेळी कार्यक्रमासाठी उपस्थित सचिन सपकाळ, अडवोकेट शुभम निंबाळकर, सतीश पांढरे, छायाताई पडसळकर, लक्ष्मण हरणावळ, शिवाजीराव इजगुडे, नवनाथ (आबा) रुपनवर, तुकाराम (तात्या )करे, युवराज (मामा) पोळ उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन गोखळी गावचे सरपंच हलका बापू पोळ, ग्रामसेविका अस्मिता गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य तुकाराम वाघमोडे, बापू पोळ, सोमनाथ झगडे, रेखा झगडे, लता अभंग, कावेरी पारेकर, नंदा चितळकर, मनीषा महानवर यांनी केले होते. सूत्रसंचालन हरणावर सर यांनी केले. तरा प्रस्ताविक उपसरपंच सचिन अजिनाथ तरंगे यांनी केले.