त्यां.....कारणामुळे ..... शेतकऱ्यांने तीन चाकी ट्रॅक्टराला पंप बसून पिकाला दिले पाणी.
अनेक दिवसांपासून राज्य शासनाच्या आदेशानुसार महावितरण कंपनीने शेती पंपाची वीज खंडित केली आहे त्यामुळे शेतकरी आणि महावितरण यांच्या मोठा संघर्ष चालू आहे अनेक भाजप शेतकरी संघटना आणि इतर पक्ष विविध ठिकाणी आंदोलन चालू आहेत मागील आडवड्यात महावितरण कंपनीने वीज पुरवठा खंडित केल्यामुळे पंढरपूर येथील एका तरुण शेतकरी यांनी आत्महत्या केली शेतकरी म्हटलं तर अनेक अडचणी च्या सामना करावाच लागतो म्हणून याला आत्महत्या हा पर्याय नाही अशा दिवसामध्ये देऊळगावराजे येथील तरुण शेतकरी लक्ष्मण पोळ यांनी वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे उभी पिके जळू लागली आहेत महावितरण कंपनी कडून वाढीव hp केल्यामुळे लाईट बिल खूप आले आहे त्यामुळे आता लगेच लाईट बिल तर भरणे शक्य नाही आधी परिस्थिती बिकट याला पर्याय म्हणून त्यांनी आपल्या तीन चाकी ट्रॅक्टराला पंप बसून आज आपल्या शेतातील पिकाला पाणी दिले त्यामुळे प्रत्येक गोष्टीला पर्याय आहे त्यासाठी शांत बसून विचार करावा असे मत पोळ यांनी मांडले