निधन वार्ता ! बारामतीतील शफिर महेबुब शेख यांचे दु:खद निधन.
बारामती - बारामती येथील शफिर महेबुब शेख यांचे वयाच्या ७० व्या वर्षी राहते घरी सोमवार दि. 7 मार्च 2022 रोजी सकाळी 10 वा. ह्रदयविकाराच्या झटक्याने दुखद निधन झाले.
पत्रकार तैनुर शफिर शेख व अॅड.शहानुर शफिर शेख यांचे ते वडिल होत.
अत्यंत मनमिळाऊ व विवेकी स्वभावाचे ते होते. सर्वांना मदत करण्यामध्ये ते सतत आघाडीवर असे. श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्यात काम करताना कामात राम पाहुन त्यांनी काम केले. त्या कामाची पावती म्हणुन भवानीनगर क्षेत्रातील आजही त्यांचे प्रत्येक कुटुंबाशी अतुट असे नाते निर्माण झालेले होते. इच्छाशक्ती प्रबळ असल्याने त्यांनी मोठमोठे आजार परतुन लावले. कोणतेही कार्य ते सकारात्मक दृष्टीकोनातुन पाहत होते व विशेष त्या कार्याला प्रोत्साहन देण्याचे काम त्यांनी केले. "चांगला स्वभाव" हा गणितातल्या शुन्यासारखा असतो, ज्याच्या सोबत असतो त्याची किम्मत नेहमीच जास्त असते. त्याप्रमाणे त्यांनी मुलांची, परिवाराची व पैपाहुण्यांची किंमत वाढवुन जगाचा निरोप घेतला.
त्यांच्या जाण्याने परिसरात शोककळा पसरली होती. अंयात्रेत सर्व स्तरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भारतीय पत्रकार (AIJ) संघ पुणे जिल्हा उपाध्यक्ष ,साप्ताहिक वतक की लकीर चे संपादक तैनुर शफिर शेख यांचे ते वडील होत.