भिमाई आश्रम शाळा इंदापुर या ठिकाणी महिला दिन साजरा ; स्त्रियांना सन्मान मिळवून देणारे गौतम बुद्ध हे अद्वितीय पुरुष:- मनिषा मखरे
इंदापूर - बौद्ध धर्माने स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केला. सर्व व्यक्तींमध्ये समता प्रस्थापित करण्याविषयी तथागतांनी धर्मोपदेश केला. महिलांच्या अधिकाराबाबत विचार करणारा व्यक्ती म्हणून गौतम बुद्धांकडे पाहिले जाते,अशा शब्दात महिला दिनी महिलांबाबत गौरवोद्गार मनिषा मखरे यांनी काढले.
भिमाई आश्रमशाळेत आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
मखरे पुढे म्हणाल्या की, बौद्ध तत्वांचा,त्यांच्या शिकवणुकीचा व जिजाऊ मासाहेब,सावित्रीबाई फुले माता रमाई, माता भिमाई ह्या महा मातांनी घालून दिलेले आदर्श, त्यांचे विचार आपण अंगीकारले तर नक्कीच आपण दुःख मुक्त होऊन आदर्श जीवन जगू शकू असे शेवटी त्यांनी आपल्या भाषणात नमूद केले.
यावेळी माता रमाई,जिजाऊ माँसाहेब, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना पुष्पहार तर दिवंगत रत्नाकर मखरे (तात्या) यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी महिला वर्गाचा प्राचार्या अनिता साळवे यांनी यथोचित सन्मान केला. यावेळी माजी नगरसेविका व संस्थेच्या अध्यक्षा आयु.शकुंतला मखरे (काकी) यांनी महिला दिनाच्या विद्यार्थिनींना व महिला कर्मचारी वर्गास शुभेच्छा दिल्या.
यावेळी प्राचार्या अनिता साळवे,उप - प्राचार्या, सविता गोफणे, प्रा. रेश्मा झेंडे,अधिक्षिका लता सातपुते, अनिसा मुल्ला, निता भिंगारदिवे व महिला स्वयंपाकी कर्मचारी, विद्यार्थी, शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारीवृंद उपस्थित होते. कार्यक्रम भिमाई आश्रमशाळेचे मुख्याध्यापक .साहेबराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन नानासाहेब सानप केले तर आभार हिरालाल चंदनशिवे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वितेसाठी बाळासाहेब गायकवाड यांनी अथक परिश्रम घेतले.