Type Here to Get Search Results !

सोमेश्वरनगर ! मु सा काकडे महाविद्यालयात 'कुमार वयीन मुला-मलींचे शिक्षण' या विषयावर अर्धदिवसीय कार्यशाळा संपन्न

सोमेश्वरनगर ! मु सा काकडे महाविद्यालयात 'कुमार वयीन मुला-मलींचे शिक्षण' या विषयावर अर्धदिवसीय कार्यशाळा संपन्न
सोमेश्वरनगर - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठचा आजीवन अध्ययन व विस्तार विभाग आणि मु. सा. काकडे महाविद्यालय सोमेश्वरनगर-वाघळवाडी (ता. बारामती) यांच्या संयुक्त विद्यमाने 'कुमार वयीन मुला-मलींचे शिक्षण' या विषयावर अर्धदिवसीय कार्यशाळा संपन्न

 गुरुवार दि. 17 मार्च 2022 रोजी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, आजीवन अध्ययन व विस्तार विभाग आणि मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालय सोमेश्वरनगर यांच्या संयुक्त विद्यमाने कुमारवयीन विद्यार्थ्यांसाठी 'कुमारवयीन मुला-मुलींचे शिक्षण' या विषयावर अर्धदिवसीय कार्यशाळेचे आयोजन गुरुवार दि. 17 मार्च 2022 रोजी करण्यात आले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य, प्रो. डॉ. देवीदास वायदंडे  यांनी उद्घाटन प्रसंगी शुभेच्छा दिल्या तर उपप्राचार्य, डॉ. जगन्नाथ साळवे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष पद भूषविले. प्रथम् सत्रामध्ये श्री. अविनाश सावंत (धो. आ.  कारभारी सातव हायस्कुल आणि ज्युनिअर कॉलेज कसबा, बारामती) "कुमारवयीन मुला-मुलींचे शिक्षण: समस्या आणि समाधान" या  विषया विचार व्यक्त करताना म्हणाले कि छत्रपति शिवाजी ने कुमारवयातच स्वराज्य ची शपथ घेतली तर ज्ञानेश्वरांनी, ज्ञानेश्वरी लिहली. जीवनात कुमारवयीन आवस्थेला खूप महत्व आहे, असेही ते म्हणाले. कार्यशाळेच्या द्वितीय सत्रामध्ये श्री. रोहिदास कोरे (उत्कर्ष माध्यमिक आश्रम शाळा वाघळवाडी) यांनी "कुमारवयीन मुला-मुलींचे ऑनलाईन शिक्षण" याविषयी विद्यार्थांना मार्गदर्शन केले.मुलांनी आई-वडील, शिक्षक व थोरा-मोठ्याचा आदर करावा. प्रत्यक्ष मित्रांशी भेटून गप्पा माराव्यात. सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद करने टाळावे. तसेच कुमारवयात चांगल्या आरोग्यसाठी दररोज व्यायाम करावा. व्यायामा अभावी कुमारवयीन मुला-मुलींनमध्ये आत्मविश्वास व एकाग्रतेची कमतरता जानवू लागली आहे.कुमारवयीन विद्यार्थ्यांनी टी.व्ही., मोबाईल च्या आभासी दुनियेतून बाहेर येऊन वास्तववादी दृष्टीकोन बाळगावा व येणाऱ्या स्थितीला आत्मविश्वासाने सामोरे जावे.  कार्यक्रमाचे  प्रास्ताविक आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे समन्वयक प्रा. पी.वा. जाधव यांनी केले. तर प्रथम सत्राचे आभार प्रा. ए. व्ही. लोढे व द्वितीय सत्राचे डॉ. डुबल सरांनी मानले. आणि कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. के. डी. जगताप यांनी केले. याप्रसंगी 'सोमेश्वर विद्यालयाचे' शारीरिक शिक्षण संचालक दीलीप वाडकर, राणी शेंडकर, सीमा शहादेव केदार, देविदास काळखैरे आपल्या इयत्ता ८ वी. व ९ वी. च्या ५५ विद्यार्थ्यांन समवेत उपस्थित होते. तसेच  महाविद्यालयाचे सहसचिव सतिश लकडे, IQAC समन्वयक, डॉ. संजू जाधव, उपप्राचार्या, प्रो. डॉ. जया कदम, संगणक विभागाचे उपप्राचार्य, आर. डी. गायकवाड़, उपप्राचार्या प्रा. मेघा जगताप, डॉ. निलेश आढाव, जगताप सर,  उपप्राचार्य, उपप्राचार्य डॉ. प्रविण ताटे, प्रा. जवाहर चौधरी, प्रा. शिंदे, डॉ. मरगजे, डॉ. घाडगे, डॉ. राजूरवार, डॉ. खरात, प्रा. तांबे इत्यादी उपस्थित होते. कार्यशाळेमध्ये सहभागी विद्यार्थिनी कु. अनुजा होळकर, कु. रामेश्वर सापते, कु. मंथन साळवे  यांनी कार्यशाळेविषयी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य, प्रो. डॉ. देवीदास वायदंडे व उपप्राचार्य डॉ. जगन्नाथ साळवे  यांच्या मार्गदर्शनाखाली महविद्यालयाच्या सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी प्रयत्न केले. आशाप्रकारे कार्यशाळा यशस्वीरित्या पार पडली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test