इंदापूर ! सुप्रिया राजगुरू यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल सावता परिषदेच्या वतीने सत्कार संपन्न
इंदापूर प्रतिनिधी दत्तात्रय मिसाळ -महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत सुप्रिया विठ्ठल राजगुरू हीची पोलिस उपनिरीक्षक (PSI) पदी निवड झाली.मोठ्या मेहेनातीने तिने घवघवीत यश संपादन केले .तिची मोठी बहीण प्रिया विठ्ठल राजगुरू हीची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली होती.तिच्या पावलावर पाऊल ठेवत तिनेही यश मिळवले आहे .तिचे प्राथमिक शिक्षण जीवन शिक्षण विद्या मंदिर निमगाव येथे तर माध्यमिक शिक्षण श्री केतकेश्वर विद्यालय निमगाव केतकी येथे झाले तर पुणे येथील एस पी कॉलेज पुणे येथे पदवीचे शिक्षण पूर्ण केले कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असूनही सर्व अडथळ्यांवर मात करत तिने उत्तुंग यश मिळवले वडील विठ्ठल राजगुरू आई जयश्री विठ्ठल राजगुरू तसेच भाऊ अजित राजगुरू यांना आनंद झाला.
सावता परिषदेच्या वतीने सावता परिषदेचे प्रदेश मुख्य संघटक संतोष राजगुरू यांनी पोलीस उपनिरीक्षक सुप्रिया राजगुरू हीचा जाहीर सत्कार केला.
या वेळी सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याणराव आखाडे यांनी फोन वरून अभिनंदन केले यावेळी संतोष राजगुरू बोलताना म्हणाले हे आमच्या राजगुरु परीवांरामध्ये प्रिया राजगुरू शेंडे व सुप्रिया राजगुरू यांच्या रूपाने पोलीस अधिकारी होऊन राजगुरू परीवारा मध्ये शिरपेच रोवला आहे या दोन्ही बहिणी प्रशासनात उत्तम कामगिरी बजावतील असा विश्वास वाटतो सावता परिषदेच्या वतीने खूप खूप शुभेच्छा दिल्या.
यावेळी विठ्ठल राजगुरू, जयश्री राजगुरू, अजित राजगुरू ,विलास राजगुरू ,शिवाजी राजगुरू उपस्थित होते.