इंदापूर ! बहुजन मुक्ती पार्टी ची जन- संवाद परिवर्तन यात्रा २२ मार्च रोजी होणार इंदापुर मध्ये दाखल.
इंदापूर प्रतिनिधी दत्तात्रय मिसाळ - बहुजन मुक्ती पार्टी ची जनसंवाद परिवर्तन यात्रा मंगळवार दिनांक २२ मार्च २०२२ रोजी सकाळी ११ वाजता पंचायत समिती सभागृह, इंदापूर या ठिकाणी दाखल होणार आहे. त्यानिमित्ताने बहुजन मुक्ती पार्टी इंदापूर च्या वतीने कार्यकर्ता मेळावा व कोरोना महामारीत तसेच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचे सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
सदर मेळाव्यात ओबीसींची जातिनिहाय जनगणना न करणे शासन जातीचे षड्यंत्र, ईव्हीएम मशीन च्या माध्यमातून मतांची चोरी करून सर्व शासकीय संस्थांचे खाजगीकरण करणे, लाॅकडाऊनच्या आडून शेतकरी व कामगार विरोधी कायदे बनवणे व जबरदस्तीने लसीकरण करणे म्हणजे लोकशाहीची हत्या करणे या विषयांवरती संवाद साधला जाणार आहे.
कार्यक्रमाची अध्यक्षता श्रीकांत (दादा) होवाळ (प्रदेशाध्यक्ष बहुजन मुक्ती पार्टी) हे करणार आहेत. तर उद्घाटक म्हणून पांडुरंग दादा रायते (पुणे जिल्हा अध्यक्ष शेतकरी संघटना) तर सन्माननीय उपस्थिती म्हणून अॅड. राहुलजी मखरे (राष्ट्रीय महासचिव बहुजन मुक्ती पार्टी) हे लाभले आहेत. विशेष उपस्थितीत सुनील काकासाहेब जाधव, सुखदेव चव्हाण, राहुल शिंगाडे, गोरक्ष बारवकर, नानासाहेब चव्हाण, हनुमंत वीर तसेच प्रमुख उपस्थितीत सचिन देशमाने, विजय चव्हाण सर, गुलाबराव फलफले, महेश लोंढे, मनीषा राहुल मखरे, पोपट आठवले, छायाताई भोंग, बकुळाताई शेंडे, वसीम शेख, अमोल मारकड,संतोष काळे, नागेश भोसले, हरिदास पवार, मंगेश घाडगे, सुरज धाईंजे, भारत मिसाळ, काजल उकिरडे, मनीषा ढावरे, आशालता मखरे, दिपाली ढावरे, रेश्मा लांडगे महावीर मिसाळ, सोमनाथ शिंदे, सागर मिसाळ, प्रकाश पवार, दादासो किरकत, अनिल खराडे, सुनील कांबळे, हे उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाचे आयोजन बाबासाहेब भोंग, संतोष शिरसागर, राजू मारकड, आजाद सय्यद, दादासाहेब आदलिंग यांनी केले आहे. अशी माहिती एका पत्रकाद्वारे अॅड. किरण लोंढे यांनी दिली.