इंदापूर - इंदापूर तालुक्यातील वरकुटे बु. येथील शेतात बेकायदेशीरपणे विनापरवाना व्यापारी व व्यवसायिक हेतुने लावलेली अफु या अंमली औषधीद्रव्य पदार्थाची लाखो रुपये किंमतीची लागवड केलेली रोपे इंदापूर पोलिसांना आढळून आली.
या प्रकरणी आरोपी पांडुरंग नामदेव कुंभार व नवनाथ गणपत शिंदे (दोघे रा. वरकुटे बु. ता.इंदापूर) यांच्या विरुद्ध इंदापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आहे.
याबाबत पोलीस हवालदार सुरेंद्र वाघ (वय 43) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सविस्तर माहिती अशी की, इंदापूर तालुक्यातील वरकुटे बु. येथील शेतकरी पांडुरंग कुंभार यांच्या शेतामध्ये विहिरीच्या कडेला भुईमूग व लसणाच्या पिकांमध्ये आंतरपीक म्हणून अफू या अंमली पदार्थाच्या झाडांची थोड्या थोड्या अंतराने बेकायदेशीरपणे विनापरवाना व्यापारी व व्यवसायिक हेतूने मानवी मेंदूवर विपरीत परिणाम करणारा अफूच्या ओल्या रोपे व बोंडांचे एकूण वजन 32 किलो अफुच्या बोंडा सह लाखो रू किमतीची रोपे लागवड केलेली मिळून आले आहे. याप्रकरणी पुढील तपास इंदापूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक टी.वाय. मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील करीत आहेत.